Goa Chess Tournament News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Chess Tournament: 'मनोहर पर्रीकर’ स्पर्धेत अमेय, एथन, ऋत्विज यांची विजयी सलामी; 23 देशांतील बुद्धिबळपटू सहभागी

Manohar Parrikar Chess Tournament: अमेय (एलो २४२२) याने पहिल्या फेरीत काळ्या मोहऱ्यांसह खेळताना छत्तीसगडच्या अयान गर्ग याला नमविले.

Sameer Panditrao

Manohar Parrikar’Goa International Open Grandmaster Chess Tournament

पणजी: गोव्याचे आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी, एथन वाझ, ऋत्विज परब यांनी ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘अ’ गटात विजयी सलामी दिली. दहा फेऱ्यांच्या या स्पर्धेत शनिवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली.

अमेय (एलो २४२२) याने पहिल्या फेरीत काळ्या मोहऱ्यांसह खेळताना छत्तीसगडच्या अयान गर्ग याला नमविले. राष्ट्रकुल पदक विजेता एथन (एलो २४१२) याने दिल्लीच्या ईशान वाधवान याला पराभूत केले, तर ऋत्विजने (एलो २३७१) तेलंगणाच्या निर्वाण भिमिदी याला पराजित केले. गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याला पहिल्या फेरीत धक्का बसला.

त्याला अमेरिकन ग्रँडमास्टर रसेट झियात्झिनोव याने ४९ चालींत पराभूत केले. उद्‍घाटन सोहळ्यास क्रीडामंत्री गोविंद गावडे, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळणकर, उपाध्यक्ष अरविंद म्हामल यांची उपस्थिती होती. स्पर्धेत भारतासह २३ देशांतील बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT