Jasprit Bumrah  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs ENG 1st Test: देवाची इच्छा असेपर्यंत...! इंग्लंडचे बारा वाजवल्यानंतर जसप्रीत बुमराह असं का म्हणाला?

Jasprit Bumrah Statement: शानदार स्पेलनंतर बुमराहला त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो अगदी स्पष्टच बोलला.

Manish Jadhav

IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी समान्यात लीड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहची जादू पाहायला मिळाली. बुमराह पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने इंग्लंडविरोधात पुन्हा एकदा पंजा खोलला. बुमराहसमोर इंग्लंडची फलंदाजी चांगलीच झगडताना दिसली. शानदार स्पेलनंतर बुमराहला त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो अगदी स्पष्टच बोलला. बुमराह म्हणाला की, देवाची इच्छा असेपर्यंत खेळेन. बोलणे हे लोकांचे कामच आहे.

बुमराह वर्कलोडबद्दल काय म्हणाला?

तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बुमराहला वर्कलोड व्यवस्थापनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, "लोक बोलतच असतात. मी 10-12 वर्षांपासून खेळत आहे. मी आयपीएल खेळतो. देवाची इच्छा असेपर्यंत मी खेळेन. मी आभा नियंत्रित करु शकत नाही. मी फक्त माझ्या तयारीवर लक्ष केंद्रित करतो आणि चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो."

बुमराहच्या गोलंदाजीदरम्यान पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चार झेल सोडण्यात आले. भारतीय खेळांडूच्या खराब कामगिरीबद्दलही जस्सीला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, "झेल सोडणे हा खेळाचा एक भाग आहे. कोणीही हे जाणूनबुजून करत नाही. खेळाडू अनुभवातून शिकतो."

बुमराहची शानदार गोलंदाजी

लीड्सच्या मैदानावर बुमराहने शानदार गोलंदाजी केली. बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघ इंग्लंडला 465 धावांवर रोखण्यात यशस्वी झाला. त्याच्या स्पेलमध्ये बुमराहने जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रुट (Joe Root), हॅरी ब्रूक आणि टंग यांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. परदेशात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराहने कपिल देवची बरोबरी केली. बुमराहने आतापर्यंत 12 वेळा घराबाहेर खेळताना एका डावात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. कपिल देवने 66 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता. मात्र जस्सीने केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT