IND vs ENG: बुमराहचा शिकार ठरलेल्या जो रुटचा करिष्मा, क्रिकेटच्या देवाचा मोडला रेकॉर्ड; बनला नंबर 1 खेळाडू

Joe Root Big Record: जो रुटने पहिल्या डावात 28 धावा केल्या, पण या खेळीच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकर आणि किंग कोहलीचा विक्रम मोडला. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज ठरला.
Joe Root Big Record
Joe Root Dainik Gomantak
Published on
Updated on

Joe Root Big Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा सर्वात धोकादायक फलंदाज जो रुट भारताविरुद्ध अपयशी ठरला. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने त्याला 28 धावांवर बाद केले. रुट कसोटी क्रिकेटमध्ये 10 व्यांदा बुमराहचा शिकार ठरला.

दरम्यान, जो रुटने (Joe Root) पहिल्या डावात 28 धावा केल्या, पण या खेळीच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकर आणि किंग कोहलीचा विक्रम मोडला. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज ठरला. रुट जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने चांगली सुरुवात केली होती, पण 28 धावांवर तो बुमराहचा शिकार ठरला.

Joe Root Big Record
IND VS ENG: गिलची धडाकेबाज कामगिरी, गांगुलीचा 'हा' मोठा विक्रम मोडत रचला इतिहास

रुट बनला नंबर 1 खेळाडू

जो रुटने आतापर्यंत इंग्लंडमध्ये (England) कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध 1589 धावा केल्या. आता त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे सोडले. यापूर्वी, सचिन इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. सचिनने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 17 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांसह 1575 धावा केल्या होत्या, परंतु आता जो रुटने 1589 धावा करुन त्याला मागे सोडले. म्हणजेच, जो रुट आता इंग्लंडच्या भूमीवर भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

दुसरीकडे, या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा राहुल द्रविड आहे, ज्याने इंग्लंडमध्ये झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत एकूण 1376 धावा केल्या होत्या, तर चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आहे, ज्याने भारताविरुद्ध 1196 धावा केल्या होत्या. याशिवाय, या यादीत पाचव्या क्रमांकावर सुनील गावस्कर आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध 1152 धावा केल्या होत्या.

Joe Root Big Record
IND VS ENG: ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये येताच केएल राहुलने जोडले हात, BCCIने शेअर केला ड्रेसिंग रूममधला UNSEEN VIDEO

इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

जो रुट (इंग्लंड): 1589 धावा

सचिन तेंडुलकर (भारत): 1575 धावा

राहुल द्रविड (भारत): 1376 धावा

अ‍ॅलिस्टर कुक (इंग्लंड): 1196 धावा

सुनील गावस्कर (भारत): 1152 धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com