Lalit Yadav Goa Ranji team, Delhi Player Goa ranji team  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: दिल्ली कॅपिटलचा 'हा' आक्रमक फलंदाज खेळणार गोव्याकडून, अष्टपैलू खेळाडूमुळे वाढली ताकत

Lalit Yadav: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) आवश्यक संघ बदल प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ललित यादव लगेच गोवा संघात दाखल होईल, असे सूत्राने नमूद केले.

Sameer Panditrao

पणजी: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला, देशांतर्गत पातळीवर दिल्लीचे प्रतिनिधित्व केलेला आक्रमक फलंदाज, फिरकी गोलंदाज ललित यादव गोव्याच्या रणजी संघातील नवा ‘पाहुणा’ असेल. त्याच्या समावेशास गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) हिरवा कंदील दाखविल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) आवश्यक संघ बदल प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ललित यादव लगेच गोवा संघात दाखल होईल, असे सूत्राने नमूद केले. दिल्लीच्या रणजी करंडक संघातून ललित अखेरच्या वेळेस जानेवारी २०२३ मध्ये, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सचे २०२१-२०२४ या कालावधीत २७

सामन्यांत प्रतिनिधित्व केले. २८ वर्षीय अष्टपैलू मध्यफळीतील आक्रमक फलंदाज असून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याने एक शतकही नोंदविले आहे. ऑफस्पिनर या नात्यानेही त्याने उपयुक्त योगदान दिलेले आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने १४२ सामन्यांत २९५५ धावा केल्या असून ११० विकेट टिपल्या आहेत.

आगामी रणजी करंडक, तसेच विजय हजारे करंडक एकदिवसीय व सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी ललित हा गोव्याचा तिसरा पाहुणा क्रिकेटपटू असेल. सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर यंदा सलग चौथा मोसम खेळणार असून कर्नाटकचा वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक यालाही जीसीएने करारबद्ध केले आहे.

स्थानिक स्पर्धांत खेळण्याचा अनुभव

दिल्लीच्या ललित यादव याला गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक स्पर्धांत खेळण्याचा अनुभव आहे. राज्यस्तरीय अ विभाग विजेत्या खोर्ली इलेव्हन संघाने या अष्टपैलूने यावर्षी सुरवातीस प्रतिनिधित्व केले होते, तसेच तो पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक क्रिकेट स्पर्धेतही खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

Horoscope: आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तुमच्या राशीचे भविष्य!

'पाकिस्तान झिंदाबाद' फलकप्रकरणी हणजूण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिस्की पीडिया स्टोअरचे मालक अडचणीत!

Goa Crime: 63 वर्षीय भाडेकरुची निर्घृण हत्या, डोंगर कापणीच्या तक्रारीतून अज्ञातांकडून मारहाण; मोरजीतील धक्कादायक घटना

IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

SCROLL FOR NEXT