FC Goa News Canva
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: आजच्या सामन्यात एफसी गोवाला ऐतिहासिक विक्रमाची संधी! ठरणार पहिलाच संघ

FC Goa: पदार्पण करणारा संघ असला तरी मोहम्मेडन क्लबने पहिल्याच लढतीत लक्षवेधक खेळ केला त्यामुळे एफसी गोवा संघासाठी होणारी लढत सोपी नसेल

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यंदा पदार्पण करणारा संघ असला तरी मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने पहिल्याच लढतीत लक्षवेधक खेळ केला. त्यामुळे एफसी गोवा संघासाठी होणारी लढत सोपी नसेल, धोका कायम असेल. कोलकता येथील किशोर भारती क्रीडांगणावर होणारा सामना रंगतदार ठरण्याचे संकेत आहेत.

मोहम्मेडन स्पोर्टिंगचा हा घरच्या मैदानावरील सलग दुसरा सामना आहे. अगोदरच्या लढतीत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला चांगलेच झुंजविले. मात्र भरपाई वेळेत गोल स्वीकारल्यामुळे त्यांना लढतीतून एकही गुण मिळाला नाही. गतमोसमात आय-लीग स्पर्धा जिंकून आंद्रे चेर्नीशोव यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने यंदा आयएसएल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

दुसरीकडे फातोर्डा येथे एफसी गोवा संघाने अतिशय खराब खेळ केला. भरपाई वेळेत गोल स्वीकारल्यामुळे त्यांना जमशेदपूर एफसीकडून २-१ फरकाने पराभव पत्करावा लागला. आपला संघ सातत्याने चुका करत असून वाईट पद्धतीने खेळत असल्याने आपण रागावल्याची कबुली खुद्द एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनीच दिलेली आहे.

‘‘आम्हाला बचावात, तसेच आक्रमणात सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही परिस्थितीनुरुप बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढील सामन्यात आणखी चांगला खेळ करू. इतर देशांतून येणाऱ्या खेळाडूंना येथे लगेच जुळवून घेणे सोपे नाही. परिस्थितीशी खेळाडू वेगळ्या पद्धतीने जुळवून घेतात. काहींना कमी वेळ लागतो तर काहींना जास्त,’’ असे सामन्याच्या पूर्वसंध्येला चेर्नीशोव यांनी सांगितले.

‘‘आम्ही निकालाबाबत आश्वासन देऊ शकत नाही, पण पहिल्या पराभवास प्रत्युत्तर देण्यासाठी सराव सत्रात खेळाडूंनी मेहनत घेतली आहे. मला वाटते की, मोहम्मेडनविरुद्ध शनिवारी ते कठोर परिश्रम करतील. आम्ही शंभर टक्के जिंकू असे सांगता येणार नाही, पण त्यासाठी निश्चित शंभर टक्के प्रयत्न करू,’’ असा आशावाद मार्केझ यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक संधी

एफसी गोवा संघाने सलामीच्या सामन्यात लौकिकास साजेसा खेळ केलेला नसला, तरी यंदा आयएसएलमध्ये त्यांना ऐतिहासिक विक्रमाची संधी आहे. सध्या माजी लीग शिल्ड विजेत्या संघाने स्पर्धेत ३४७ गोल केले आहेत, आणखी तीन गोल नोंदविल्यास हा संघ स्पर्धेत साडेतीनशे गोल करणारा पहिला संघ ठरेल. त्यांनी १२४ गोल अवे मैदानावर नोंदविले आहे.

नामुष्की टाळावी लागेल

आयएसएल स्पर्धेत २०१६ व २०२१-२०२२ मधील स्पर्धेत एफसी गोवावर सलामीच्या सामन्यासह सलग तीन लढती गमावण्याची नामुष्की आली होती, यंदा ती टाळण्यासाठी त्यांना दक्ष राहावे लागेल. आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा आणि मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्यात प्रथमच लढत होत आहे. यापूर्वी त्यांच्यात २०२१ मध्ये ड्युरँड कप स्पर्धेची अंतिम लढत झाली होती. तेव्हा एदू बेदियाच्या अतिरिक्त वेळेतील गोलमुळे गोव्यातील संघाने बाजी मारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT