virat kohli  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Record: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत विराट कोहलीने आपल्या बॅटने शानदार कामगिरी केली होती.

Manish Jadhav

बडोदा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेचा थरार आजपासून (11 जानेवारी) बडोद्याच्या भव्य स्टेडियमवर सुरु झाला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले असून खुद्द कर्णधार शुभमन गिलसह श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, सामना सुरु होताच सर्वांच्या नजरा खिळल्या त्या 'किंग कोहली'वर, ज्याने मैदानावर पाऊल ठेवताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

विराटने मोडला सौरव गांगुलीचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या बॅटने शानदार कामगिरी केली होती. तोच फॉर्म तो या मालिकेतही कायम राखेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरताच विराटने भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीला मागे सोडले.

भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आता 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सौरव गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत एकूण 308 वनडे सामने खेळले होते. विराटने आज आपला 309 वा सामना खेळून त्याला मागे टाकले. आता या यादीत विराटच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन हे खेळाडू उरले आहेत.

भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने खेळणारे टॉप 5 खेळाडू

  • सचिन तेंडुलकर: 463 सामने

  • एम.एस. धोनी: 347 सामने

  • राहुल द्रविड: 340 सामने

  • मोहम्मद अझरुद्दीन: 324 सामने

  • विराट कोहली: 309 सामने (आजच्या सामन्यासह)

पॉन्टिंग आणि सेहवागला मागे टाकण्याची सुवर्णसंधी

विराट कोहलीकडे केवळ सामने खेळण्याचाच नव्हे, तर शतकांचा एक मोठा विक्रम करण्याचीही संधी आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि वीरेंद्र सेहवाग हे तिघेही प्रत्येकी 6 शतकांसह अव्वल स्थानी आहेत. या मालिकेत जर विराटने अजून एक शतक झळकावले, तर तो न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके (7) ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज बनेल.

सामन्याचे समीकरण आणि भारतीय संघ

बडोद्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जात असली तरी, सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू स्विंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन शुभमन गिलने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजच्या पुनरागमनामुळे भारतीय वेगवान गोलंदाजीला अधिक धार आली आहे, तर श्रेयस अय्यरच्या येण्याने मधली फळी मजबूत झाली आहे. न्यूझीलंडचा संघ देखील कडवे आव्हान देण्यासाठी सज्ज असून दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT