IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

IND VS NZ 1st ODI: भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेला उद्या, ११ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.
IND VS NZ 1st ODI
IND VS NZ 1st ODIDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेला उद्या, ११ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथील बीसीए (BCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी एकदिवसीय मैदानात उतरणार असल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत.

सामन्याची वेळ आणि नाणेफेक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. मैदानावर नाणेफेक (Toss) दुपारी १:०० वाजता होईल. वडोदऱ्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जात असली, तरी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांनाही येथे मदत मिळण्याची शक्यता आहे.

IND VS NZ 1st ODI
South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

थेट प्रक्षेपण आणि मोबाईलवर मोफत आनंद अनेक चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की हा सामना नेमका कुठे पाहता येईल? तर, या सामन्याचे थेट प्रक्षेपण 'स्टार स्पोर्ट्स' (Star Sports) नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. ज्या प्रेक्षकांना हा सामना मोबाईलवर पाहायचा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे 'डिज्नी+ हॉटस्टार' (Disney+ Hotstar) या ॲपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, मोबाईल युजर्ससाठी हा सामना पाहणे पूर्णपणे मोफत असेल. प्रेक्षकांना केवळ त्यांचा डेटा खर्च करावा लागेल, यासाठी वेगळ्या सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.

IND VS NZ 1st ODI
Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे श्रेयस अय्यरचे भारतीय संघात झालेले पुनरागमन. दुखापतीमुळे आणि फॉर्ममुळे संघाबाहेर असलेल्या श्रेयसकडे मध्यम फळीची धुरा असेल. तसेच, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, श्रेयस अय्यर उपकर्णधाराची भूमिका निभावणार आहे. न्यूझीलंडच्या बाजूने डेव्हन कॉनवे आणि डॅरेल मिशेल यांसारखे खेळाडू भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतील.

दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू (Squads):

  • भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर.

  • न्यूझीलंड संघ: मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हन कॉनवे, डॅरेल मिशेल, आदित्य अशोक, जोश क्लार्कसन, जॅक फाउल्क्स, मिचेल हे, निक केली, हेन्री निकोल्स, जेडेन लेनॉक्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग, काईल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com