IND vs ENG Test 2025 Live Streaming In India: आयपीएल 2025 संपल्यानंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आणि वेगळी असणार आहे. या मालिकेद्वारे शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करताना दिसेल. याशिवाय, ही मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या एका नवीन सायकलची सुरुवात असेल. चला तर मग जाणून घेऊया की, तुम्ही ही मालिका भारतात कधी, कुठे आणि कशी लाईव्ह पाहू शकता (IND vs ENG Test Live Streaming).
दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर ही टीम इंडियाची पहिली कसोटी मालिका असणार आहे. रोहितने मे महिन्याच्या सुरुवातीला या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांनी विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
भारत (India) आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होईल. त्याआधी टीम इंडिया 13 जून रोजी सराव सामना खेळेल. मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलै रोजी खेळवला जाईल.
भारत आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर लाईव्ह पाहता येईल.
तसेच, कसोटी मालिका JioHotstar द्वारे लाईव्ह स्ट्रीम केली जाईल. सध्या खेळल्या जात असलेल्या IPL चे देखील JioHotstar द्वारे लाईव्ह स्ट्रीम केले जात आहे.
पहिली कसोटी- 20-24 जून, हेडिंग्ले (लीड्स)
दुसरी कसोटी- 2-6 जुलै, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)
तिसरी कसोटी- 10-14 जुलै, लॉर्ड्स (लंडन)
चौथी कसोटी- 23-27 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)
पाचवी कसोटी- 31जुलै- 4 ऑगस्ट, ओव्हल (लंडन).
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.