IND vs ENG: कटकमध्ये रोहितचा 'हिट शो', शतक झळकावून द्रविडला सोडले मागे; वॉर्नरच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Rohit Sharma ODI Century: रोहित शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
IND vs ENG: कटकमध्ये रोहितचा 'हिट शो', शतक झळकावून द्रविडला सोडले मागे; वॉर्नरच्या रेकॉर्डशी केली बरोबरी
Rohit Sharma ODI CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma ODI Century: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. रोहित शर्मा बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत होता. या शतकासह, त्याने फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवून दिले आहेत. याशिवाय, त्याने टीकाकारांनाही शांत केले.

32 वे शतक

दरम्यान, रोहित शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने केवळ 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने शतकाच्या दिशेने आगेकूच करत 76 चेंडूत शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 32 वे शतक आहे.

IND vs ENG: कटकमध्ये रोहितचा 'हिट शो', शतक झळकावून द्रविडला सोडले मागे; वॉर्नरच्या रेकॉर्डशी केली बरोबरी
Rohit Sharma: मैदानात उतरताच 'हिटमॅन'ने रचला इतिहास, केला 'हा' मोठा पराक्रम

राहुल द्रविडला मागे सोडले

याशिवाय, रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 49 वे शतक आहे. यासह, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले. द्रविडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतके आहेत. रोहितने डेव्हिड वॉर्नरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 शतके ठोकली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय फलंदाज:

सचिन तेंडुलकर - 100 शतके

विराट कोहली - 81 शतके

डेव्हिड वॉर्नर- 49 शतके

रोहित शर्मा – 49 शतके

राहुल द्रविड - 48 शतके

वीरेंद्र सेहवाग - 38 शतके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com