IFL 2026 Dainik Gomatnak
गोंयचें खेळामळ

IFL 2026: 'धेंपो क्लब' सलग 2 पराभवांनंतर नामुष्की टाळणार? नामधारी एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर फातोर्डा येथे रंगणार सामना

Dempo Club vs Namdhari FC: सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. पाच सामने खेळल्यानंतर धेंपो क्लबच्या खाती फक्त दोन गुण आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लब सध्या इंडियन फुटबॉल लीगमध्ये (आयएफएल) अखेरच्या दहाव्या क्रमांकावर आहे. अगोदरच्या लागोपाठ दोन लढतीत पराभव पत्करल्यानंतर माजी आय-लीग विजेता संघ गुरुवारी(ता. २) नामधारी एफसीविरुद्ध खेळेल, त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी गोव्यातील संघाला दक्ष राहावे लागले.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. पाच सामने खेळल्यानंतर धेंपो क्लबच्या खाती फक्त दोन गुण आहेत. अजूनही त्यांना विजय मिळालेला नसून दोन बरोबरी व तीन पराभवांसह त्यांची घसरण झालेली आहे.

धेंपो क्लबला मागील दोन लढतीत अनुक्रमे गोकुळम केरळा (२-०) व श्रीनिदी डेक्कन (३-१) या संघांकडून पराभव पत्करावा लागला. धेंपो क्लबचा बचाव कमजोर असून स्पर्धेत त्यांनी तब्बल ११ गोल स्वीकारले आहेत.

पंजाबमधील नामधारी एफसीने पाच लढतीतून सहा गुणांची कमाई केली आहे. एक विजय, तीन बरोबरी व एक पराभव अशी कामगिरी नोंदविली आहे. अगोदरच्या दोन लढतीत ते अपराजित आहेत. श्रीनिदी डेक्कनविरुद्धच्या १-१ गोलबरोबरीनंतर त्यांनी रियल काश्मीरला १-० असे पराजित केले. नामधारी संघ गोव्यातही पूर्ण तीन गुणांसाठी प्रयत्नशील असेल.

प्रशिक्षक समीर यांचा सकारात्मक दृष्टिकोन

धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक यांनी गुरुवारच्या लढतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. ते म्हणाले, ‘‘आता आम्ही पुन्हा घरच्या मैदानावर परतलो आहोत आणि काही सराव सत्रेही घेतली आहेत. आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, काही विशिष्ट बाबींवर काम केले आहे आणि मला वाटते की संघामध्ये आता मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आहे. एकाग्रतेच्या अभावामुळे आम्हाला सामने गमवावे लागले आणि त्यावर आम्ही काम केले आहे. मला पूर्ण खात्री आहे की उद्या मैदानात उतरलेला धेंपो संघ पूर्णपणे वेगळा दिसेल.’’

गतमोसमातील लढतींत

३ डिसेंबर २०२४ रोजी धेंपो क्लबचा १-० असा विजय

१३ फेब्रुवारी २०२५ रोजी धेंपो क्लब व नामधारी यांच्यात २-२ गोलबरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT