Indian Football League: धेंपो क्लबचा पाय आणखी खोलात, दहा खेळाडूंसह श्रीनिदी डेक्कनचा 3-1 असा दमदार विजय

Sreenidi Deccan FC vs Dempo SC 2026: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) सामन्यात श्रीनिदी डेक्कन एफसीला अखेरची २३ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले, तरीही त्यांनी वर्चस्व गमावले नाही.
Indian Football League
Indian Football LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) सामन्यात श्रीनिदी डेक्कन एफसीला अखेरची २३ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले, तरीही त्यांनी वर्चस्व गमावले नाही आणि धेंपो स्पोर्टस क्लबवर ३-१ असा दमदार विजय प्राप्त केला आणि गुणतक्त्यात अग्रस्थानही पटकावले. या पराभवामुळे गोव्यातील संघाला पाच सामने खेळूनही विजयाविना राहावा लागले, तिसऱ्या पराभवामुळे त्यांची तळातील घसरण कायम राहिली.

हैदराबाद येथील डेक्कन अरेनावर बुधवारी सामना झाला. श्रीनिदी डेक्कनचा मध्यरक्षक लालरोमाविया याला दोन मिनिटांच्या अंतराने दोन वेळा ताकीद मिळाल्यामुळे ६७व्या मिनिटास रेड कार्डसह मैदान सोडावे लागले आणि यजमान संघाचा एक खेळाडू कमी झाला.

धेंपो क्लबला प्रतिस्पर्धी दहा खेळाडूंसह खेळत असल्याचा फायदा उठवता आला नाही, उलट श्रीनिदी डेक्कनने आणखी एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केले. धेंपो क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी या लढतीच्या ‘स्टार्टिंग लाईन-अप’मध्ये चार बदल करताना अमेय मोरजकर, मार्कुस जोसेफ, आर्नोल्ड ऑलिव्हेरा, सेबॅस्टियन गुटिएरेझ यांच्या जागी ॲरिस्टन कॉस्ता, रिचमंड ओवुसू, महंमद अली, कपिल होबळे यांना संधी दिली.

Indian Football League
Goa Weather: पारा 33.6 अंशावर… अंगाची लाहीलाही! उष्म्याच्या तीव्र झळांनी गोमंतकीय हैराण

श्रीनिदी डेक्कन संघ पूर्वार्धात २-० असा आघाडीवर होता. आर. लालबियाकलियाना याने चौथ्याच मिनिटास गोल केला. नंतर २८व्या मिनिटास दाही इद्रीसौ याने यजमान संघाच्या आघाडीत आणखी एका गोलची भर टाकली. ६०व्या मिनिटास रिचमंड ओवुसू याने धेंपो क्लबची पिछाडी १-२ अशी कमी केली, मात्र फॅब्रिस न्कवोह याने ७०व्या मिनिटास गोल करून श्रीनिदी डेक्कनला स्पर्धेतील तिसरा विजय मिळवून दिला.

Indian Football League
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

त्यांचे आता पाच लढतीतून १० गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील डायमंड हार्बर संघापेक्षा श्रीनिदी डेक्कनचा एक गुण जास्त आहे. धेंपो स्पोर्टस क्लबला सलग दुसरा, तर एकंदरीत तिसरा पराभव पत्करावा लागला. पाच लढतीनंतर दोन गुणांसह ते दहा संघांत नवव्या क्रमांकावर कायम राहिले. धेंपो क्लबचा पुढील सामना घरच्या मैदानावर फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दोन एप्रिल रोजी नामधारी एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com