Hardik Pandya  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ICC T20 Rankings: हार्दिकचा जलवा जलाल! पुन्हा बनला नंबर-1 टी-20 ऑलराऊंडर; तिलकने SKY आणि बाबरला सोडले मागे

हार्दिक पुन्हा एकदा नंबर-1 टी-20 ऑलराऊंडर बनला आहे. इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी यांना मागे टाकत हार्दिकने नंबर 1 चा किताब पटकावला.

Manish Jadhav

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी T20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर मोठा फायदा झाला. हार्दिक पुन्हा एकदा 'नंबर-1 टी-20 ऑलराऊंडर' बनला. इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी यांना मागे टाकत हार्दिकने नंबर 1 चा किताब पटकावला.

हार्दिकचे सध्या 244 रेटिंग गुण आहेत. लिव्हिंगस्टोन 230 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला. तर ऐरी (230) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 39 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या मालिकेत त्याने दोन विकेट्सही घेतल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही मालिका 3-1 ने खिशात घातली.

तिलकची शानदार कामगिरी! सूर्या-बाबरला सोडले मागे

हार्दिकने दुसऱ्यांदा T20 ऑलराऊंडर्सच्या क्रमवारीत नंबर-1 स्थान मिळवले आहे. 2024 च्या T20 विश्वचषकाच्या शेवटी त्याने प्रथमच अव्वल स्थान गाठले होते. ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेणारा हार्दिक हा एकमेव भारतीय खेळाडू नाहीये.

फलंदाजांच्या यादीत युवा क्रिकेटर तिलक वर्मालाही मोठा फायदा झाला आहे. त्याने 69 अंकाची झेप घेत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि बाबर आझम यांना मागे टाकत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तिलकच्या खात्यात 806 रेटिंग गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी-20मध्ये त्याने नाबाद शतकी खेळी खेळली होती. विशेष म्हणजे, त्याने 280 धावा करुन 'प्लेयर ऑफ द सिरीजचा' किताबही पटकवला.

'शतकवीर' संजू सॅमसन

दुसरीकडे मात्र, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला क्रमवारीत फटका बसला. 788 गुणांसह तो चौथ्या क्रमांकावर घसरला. तर बाबर पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे 742 गुण आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने क्रमवारीत शानदार कामगिरी केली. 17 अंकाची झेप घेत तो 22व्या क्रमांकावर पोहोचला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या आणि चौथ्या सामन्यात त्याने शतके झळकावली होती. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ट्रिस्टन स्टब्स (23 व्या स्थानावर) आणि हेनरिक क्लासेन (59 व्या स्थानावर) यांनी देखील त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली.

श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस (12 व्या स्थानावर), वेस्ट इंडिजचा शाई होप (वर 21 व्या स्थानावर), ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस (45 व्या स्थानावर) यांना देखील फायदा झाला. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (855) अव्वल स्थानी कायम आहे.

अर्शदीपला फायदा

टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीतही मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज ॲडम झाम्पा (693) आणि नॅथन एलिस (628) अनुक्रमे तिसऱ्या आणि 11व्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला. तर दुसरीकडे, भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (656) नवव्या क्रमांकावर पोहोचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर त्याने हे स्थान गाठले.

अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ विकेट घेतल्या. टॉप-10 मध्ये भारताचे दोन गोलंदाज आहेत. फिरकीपटू रवी बिश्नोई (666) आठव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद (701) अव्वल स्थानी कायम आहे. त्याच्या खालोखाल वानिंदू हसरंगा (696) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT