Dempo Club Vs Namdhari FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: 'धेंपो'ला चिंता गोल नोंदवण्याची, दिल्लीसमोर कामगिरी उंचावायची नामी संधी

Dempo Club Vs Delhi FC: धेंपो क्लबने १० सामन्यांतून तीन विजय, दोन बरोबरी व पाच पराभवांसह ११ गुणांची कमाई केली आहे.

Sameer Panditrao

I League Dempo Club Vs Delhi FC

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक आपल्या संघाच्या बचावफळीतील कामगिरीवर खूष आहेत, परंतु संधी निर्माण करूनही आक्रमणात गोल होत नसल्याबद्दल चिंतित आहेत. या पार्श्वभूमीवर आय-लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्यांची बुधवारी (ता. २९) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिल्ली एफसीविरुद्ध लढत होईल.

धेंपो क्लबने १० सामन्यांतून तीन विजय, दोन बरोबरी व पाच पराभवांसह ११ गुणांची कमाई केली आहे. प्रतिस्पर्धी दिल्ली एफसी संघही सातत्यात कमी असून १० सामन्यांतून दोन विजय, तीन बरोबरी व पाच पराभवांसह त्यांच्या खाती नऊ गुण आहेत. धेंपो क्लबला मागील पाच सामन्यांतून फक्त एकाच गुणाची कमाई करता आली, तर दिल्लीने लागोपाठ दोन सामने गमावले आहे. धेंपो क्लबला अगोदरच्या लढतीत श्रीनगर येथे रियल काश्मीरकडून २-० फरकाने पराभव पत्करावा लागला, तर दिल्ली एफसीला ऐजॉल एफसीने ४-२ असे हरविले.

धेंपो क्लबने स्पर्धेतील दहा सामन्यात फक्त सहा गोल नोंदविले, तर १० गोल स्वीकारले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर म्हणाले, की ``बचावफळीबाबत मला चिंता नाही. आम्ही कमी गोल स्वीकारताना चार क्लीन शीट्स राखल्या आहेत. संधी निर्माण करत असताना असताना आम्ही गोल नोंदविणे आवश्यक आहे.``

समीर यांनी सांगितले, की ``संघातील परदेशी खेळाडूंना स्थिरावण्यासाठी निश्चितच थोडा अवधी लागेल. आम्ही सर्वोत्तम कामगिरीसह विजयासाठी निश्चितच प्रयत्नशील आहोत. अगोदरच्या सामन्यांत अखेरच्या टप्प्यात आम्ही सामने गमावले, कदाचित सामन्यातील एकाग्रता गमावल्यामुळे किंवा प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्यामुळे हे घडले असावे. आमच्या संघातील नवोदित खेळाडू युवा आणि अननुभवी आहेत. संघात दुखापतग्रस्त खेळाडू आहेत. तरीही माझा स्थानिक खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. परदेशी खेळाडू बदलत असले, तरी आमचा लढाऊ बाणा कायम आहे.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हरमल किनाऱ्यावर आढळला परदेशी महिलेचा मृतदेह, बुडून मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस तपास सुरु

Sanju Samson Record: संजू सॅमसन बनणार 'सिक्सर किंग'; धोनी, रैना आणि धवनला टाकणार मागे, फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Gen Z Protest in Nepal: सोशल मीडिया बॅनचा नेपाळला फटका, युवा पिढी आक्रमक; थेट संसदेत घुसुन तोडफोड Watch Video

Asia Cup 2025: 8 संघांचे 8 धुरंधर फलंदाज, आशिया कपमध्ये ठरतील 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

सात मुली अनाथ झाल्या, गरीब कुटुंबाने कमवता पुरुष गमावला; गोव्यात रोजंदारी करणाऱ्या मजुराचा सर्पदंशाने मृत्यू

SCROLL FOR NEXT