Churchill Brothers Vs Delhi FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League Football: दिल्ली एफसीला नमवून ‘चर्चिल’ मजबूत! वेड, ट्रिजॉयने नोंदवले गोल

Churchill Brothers Vs Delhi FC: १८ व्या मिनिटास दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने गोल केला, तर ३७व्या मिनिटास ट्रिजॉय डायस याने गोव्यातील संघाची स्थिती बळकट करणारा गोल नोंदविला.

Sameer Panditrao

I League Football Churchill Brothers Vs Delhi FC

पणजी: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान मजबूत करताना शुक्रवारी दिल्ली एफसीवर २-१ असा विजय प्राप्त केला. सामना पंजाबमधील माहिलपूर येथे झाला.

चर्चिल ब्रदर्सने सामन्यातील पूर्वार्धात दोन गोलची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. १८ व्या मिनिटास दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने गोल केला, तर ३७व्या मिनिटास ट्रिजॉय डायस याने गोव्यातील संघाची स्थिती बळकट करणारा गोल नोंदविला. बदली खेळाडू ह्रदय जैन याने ८१व्या मिनिटास शानदार फटक्यावर दिल्ली एफसीची पिछाडी एका गोलने कमी केली.

चर्चिल ब्रदर्सचा हा नऊ सामन्यांतील सहावा विजय ठरला. गुणतक्त्यात त्यांचे आता सर्वाधिक १९ गुण झाले आहेत. दिल्ली एफसीला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ लढतींतून त्यांचे नऊ गुण कायम राहिले. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना २५ जानेवारी रोजी अवे मैदानावर राजस्थान युनायटेडविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT