Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: धेंपो क्लबसमोर शिलाँग लाजाँगचे आव्हान! रंगतदार सामन्यात कोण बाजी मारणार?

Dempo Club Vs Shillong Lajong FC: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत प्रगती साधण्यासाठी इच्छुक असलेल्या धेंपो स्पोर्टस्‌ क्लब, तसेच शिलाँग एफसी सामना रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

Sameer Panditrao

I League Dempo Club Vs Shillong Lajong FC

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत प्रगती साधण्यासाठी इच्छुक असलेल्या धेंपो स्पोर्टस्‌ क्लब, तसेच शिलाँग लाजाँग एफसी यांच्यातील सामना रंगतदार होण्याचे संकेत आहेत. सामना बुधवारी (ता. १९) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

संघातील नवा परदेशी खेळाडू मार्कुस जोसेफ याच्या गोलमुळे मागील लढतीत धेंपो क्लबने नामधारी एफसीला २-२ असे गोलबरोबरीत रोखले होते. त्यांचे सध्या १४ सामन्यांतून १८ गुण असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. शिलाँग लाजाँग एफसी १४ सामन्यांतून २२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. मागील लढतीत त्यांनी घरच्या मैदानावर श्रीनिदी डेक्कनला ४-० असे सहज नमविले होते. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मागील ३० नोव्हेंबर रोजी शिलाँग येथे धेंपो क्लबने शिलाँग लाजाँगला २-० फरकाने नमविले होते.

शिलाँग लाजाँगविरुद्धच्या सामन्याविषयी धेंपो क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी आम्ही मैदानात उतरताना विजयासाठीच खेळतो. हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर आम्ही उद्या जिंकलो, तर आम्ही पुन्हा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी सक्षम बनू.

संघातील नवा खेळाडू त्रिनिदाद-टोबॅगोचा मार्कुस जोसेफ याचे समीर यांनी कौतुक केले. त्याच्याविषयी समीर म्हणाले, त्याला खेळविण्याबाबत मी संधी घेतली आणि ती जुळून आली. तो जणू सहा महिन्यांपासून आमच्या संघात आहे असे वाटले. तो सहजपणे संघाशी समरस झाला आहे. त्याने इतर खेळाडूंसोबत छान समन्वय साधला आणि भारतीय फुटबॉलमधील अगोदरच्या अनुभवामुळे त्याने पटकन जुळवून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT