I League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: 'गोकुळम'च्या विस्कळीत बचावाचा फायदा घेत चर्चिल ब्रदर्सचा विजय, दोन गुण कमावत अग्रस्थानी झेप

Churchill Brothers Vs Gokulam Kerala: चर्चिल ब्रदर्सने प्रतिस्पर्धी गोकुळम केरळाच्या विस्कळीत बचावाचा लाभ उठविला आणि विजयासह आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दोन गुणांची आघाडी घेतली.

Sameer Panditrao

I League Churchill Brothers Vs Gokulam Kerala

पणजी: चर्चिल ब्रदर्सने प्रतिस्पर्धी गोकुळम केरळाच्या विस्कळीत बचावाचा लाभ उठविला आणि विजयासह आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दोन गुणांची आघाडी घेत पुन्हा अग्रस्थान पटकावले. राय पंचायत मैदानावर शुक्रवारी झालेल्या लढतीत यजमान संघाने २-१ फरकाने बाजी मारली.

लालरेमरुआता राल्टे याच्या फ्रीकिक गोलवर चर्चिल ब्रदर्सने २१व्या मिनिटास गोल खाते उघडले. नंतर ६२व्या मिनिटास किंग्सली फर्नांडिस याने केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सची स्थिती मजबूत झाली. त्यांचा हा स्पर्धेतील एकूण २६वा गोल ठरला. भरपाई वेळेत (९०+४वे मिनिट) मायकल सूसाईराज याच्या गोलमुळे गोकुळम केरळास पिछाडी एका गोलने कमी करता आली.

मागील लढतीत याच मैदानावर तळाच्या स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या चर्चिल ब्रदर्सने शुक्रवारी स्पर्धेतील आठव्या विजयाची नोंद केली. त्यांचे १३ सामन्यांतून २६ गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील नामधारी एफसीचे १२ लढतीतून २४ गुण आहेत. नामधारीचा सामना शनिवारी शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध होणार आहे, तोपर्यंत चर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित असेल. गोकुळम केरळास सलग दुसरा, तर एकंदरीत चौथा पराभव पत्करावा लागला. १३ लढतीतून त्यांचे १९ गुण कायम असून ते सहाव्या स्थानी आहेत. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना ११ फेब्रुवारीस राय मैदानावरच दिल्ली एफसीविरुद्ध खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT