I League: ‘धेंपो क्लब’चा ‘इंटर काशी’ला धक्का! गोलरक्षक आशिषने रोखला निर्णायक पेनल्टी फटका

Dempo Club Vs Inter Kashi FC: पाच वेळच्या माजी विजेत्या धेंपो क्लबला पूर्ण तीन गुण मिळवून देताना अर्जेंटिनातील दामियन याने अनुक्रमे ४२व्या व ८१व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.
Dempo Club Vs Inter Kashi FC
I League Dempo ClubDainik Gomantak
Published on
Updated on

I League Dempo Club Vs Inter Kashi FC

पणजी: ख्रिस्तियन दामियन पेरेझ रोआ याने केलेल्या दोन गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने शुक्रवारी रात्री आय-लीग फुटबॉल सामन्यात इंटर काशी एफसीला २-० फरकाने पराभवाचा धक्का दिला. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झाला.

धेंपो क्लबच्या विजयात गोलरक्षक आशिष सिबी याची अफलातून दक्षताही निर्णायक ठरली. त्याने ६५व्या मिनिटास दोमिंगो बेर्लांगा याचा पेनल्टी फटका अचूक अंदाज बांधत रोखला व संघाची आघाडी अबाधित राखली.

पाच वेळच्या माजी विजेत्या धेंपो क्लबला पूर्ण तीन गुण मिळवून देताना अर्जेंटिनातील दामियन याने अनुक्रमे ४२व्या व ८१व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. पहिला गोल संघातील नवा परदेशी हुआन मेरा याच्या असिस्टवर झाला.

Dempo Club Vs Inter Kashi FC
I League: सामना बरोबरीत सुटल्याने चर्चिल ब्रदर्सचे नुकसान, अग्रस्थान मिळविण्याची गमावली संधी

इंटर काशी संघाला सामन्यातील ५४ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले, त्याचा लाभ धेंपो क्लबने उठविला. इंटर काशीचा बचावपटू संदीप मंडी याला ३६व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबचा हा स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. त्यांचे १३ सामन्यांतून १७ गुण झाले असून सातवा क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेतील चौथ्या पराभवामुळे इंटर काशी एफसीचे नुकसान झाले. १३ लढतींनंतर २१ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिले. धेंपो क्लबचा पुढील सामना १३ फेब्रुवारीस फातोर्डा येथे नामधारी एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com