Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League 2024: चुरशीच्या लढतीत चर्चिल ब्रदर्स विजयी! धेंपो क्लबला मात्र पराभवाचा धक्का; बंगळूरने उघडले खाते

I league 2024 Football Matches: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. कोझिकोड येथे झालेल्या लढतीत त्यांनी गोकुळम केरळावर १-० फरकाने मात केली. बंगळूर येथे सलग तीन सामने अपराजित राहिल्यानंतर धेंपो स्पोर्टस क्लबला पराभवाचा धक्का बसला. त्यांना स्पोर्टिंग क्लब बंगळूरने ३-१ फरकाने नमविले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामन्याच्या १४व्या मिनिटास स्टेन्डली फर्नांडिस याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. कोझिकोड येथे झालेल्या लढतीत त्यांनी गोकुळम केरळावर १-० फरकाने मात केली.

चर्चिल ब्रदर्सचे आता चार लढतीतून सात गुण झाले असून त्यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्यांचा पुढील सामना १४ डिसेंबर रोजी इंटर काशी संघाविरुद्ध कल्याणी येथे होईल. स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे गोकुळम केरळाचे चार लढतीतून पाच गुण कायम राहिले.

बंगळूर येथे सलग तीन सामने अपराजित राहिल्यानंतर धेंपो स्पोर्टस क्लबला पराभवाचा धक्का बसला. त्यांना स्पोर्टिंग क्लब बंगळूरने ३-१ फरकाने नमविले. विजयी संघासाठी कृष्णानंद सिंग (१ मिनिट), सलाम जॉन्सन सिंग (८७वे मिनिट) व जॉर्डन लमेला (९०+५वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. धेंपो क्लबला ४३व्या मिनिटास साईश बागकर याने बरोबरी साधून दिली होती. पहिल्या पराभवामुळे धेंपो क्लबचे चार लढतीतून सात गुण कायम राहिले. ते आता चौथ्या स्थानी आहेत. त्यांचा पुढील सामना १३ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे श्रीनिदी डेक्कनविरुद्ध होईल. स्पोर्टिंग बंगळूरने पहिल्या विजयाच्या तीन गुणांसह गुणखाते उघडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हरमल किनाऱ्यावर आढळला परदेशी महिलेचा मृतदेह, बुडून मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस तपास सुरु

Nepal Video: नेपाळमध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर, संसदेत घुसून राडा, 9 जणांचा मृत्यू, 170 हून अधिक जखमी; सोशल मीडिया बंदी, भ्रष्टचारावरुन Gen Z चे बंड

Sanju Samson Record: संजू सॅमसन बनणार 'सिक्सर किंग'; धोनी, रैना आणि धवनला टाकणार मागे, फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Gen Z Protest in Nepal: सोशल मीडिया बॅनचा नेपाळला फटका, युवा पिढी आक्रमक; थेट संसदेत घुसुन तोडफोड Watch Video

Asia Cup 2025: 8 संघांचे 8 धुरंधर फलंदाज, आशिया कपमध्ये ठरतील 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

SCROLL FOR NEXT