Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

Manish Jadhav

Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. मात्र, या सामन्यात खरी चर्चा रंगली ती म्हणजे स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या विक्रमी फलंदाजीची आणि त्यानंतर त्याने मैदानावरुनच आपल्या प्रेयसीवर व्यक्त केलेल्या प्रेमाची. हार्दिकने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास तर रचलाच, पण स्टँडमध्ये बसलेली आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला 'फ्लाइंग किस' देऊन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.

सामन्याची सुरुवात भारतीय सलामीवीरांनी अत्यंत विस्फोटक पद्धतीने केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. संजू सॅमसनने 22 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली, तर अभिषेक शर्माने 21 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. या दोघांनी दिलेल्या वेगवान सुरुवातीमुळे भारताला (India) मोठ्या धावसंख्येचा पाया रचता आला. यानंतर मैदानात आलेल्या तिलक वर्माने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत आफ्रिकेच्या गोलंदाजांना मैदानाभोवती पळवले. तिलकने 42 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात अनेक प्रेक्षणीय चौकार आणि षटकारांचा समावेश होता.

मात्र, खरा थरार अजून बाकी होता. हार्दिक पांड्या (Haedik Pandya) मैदानात उतरला आणि त्याने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. हार्दिकने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला. त्याने अवघ्या 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला. भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम अद्यापही युवराज सिंगच्या (12 चेंडू) नावावर आहे, पण हार्दिकने आज 16 चेंडूत ही किमया करुन अभिषेक शर्माचा (17 चेंडू) विक्रम मोडीत काढला. हार्दिकने 25 चेंडूत 63 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 5 गगनभेदी षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 252 चा होता.

हार्दिकने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जे सेलिब्रेशन केले, ते पाहून चाहते चकीत झाले. अर्धशतक पूर्ण होताच हार्दिकने बॅट उंचावली आणि स्टँडमध्ये बसलेली आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्याकडे पाहत 'फ्लाइंग किस' दिला. हार्दिकचा हा रोमँटिक अंदाज पाहून माहिका देखील भारावून गेली आणि तिनेही त्याला प्रतिसादा दाखल फ्लाइंग किस दिला. हार्दिकने काही महिन्यांपूर्वीच माहिका शर्मासोबतच्या आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. या दोघांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये याचीच मोठी चर्चा रंगली.

हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यातील भागीदारीमुळे भारतीय संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 231 धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण आफ्रिकेच्या समोर आता विजयासाठी 232 धावांचे विशाल लक्ष्य आहे. भारतीय फलंदाजीने आज ज्या पद्धतीने कामगिरी केली, ते पाहता हा सामना भारताच्या खिशात असल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित हजारो प्रेक्षकांसाठी हार्दिकची फटकेबाजी आणि त्याचा हा रोमँटिक क्षण आजच्या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले. आता सर्वांचे लक्ष भारतीय गोलंदाजीकडे लागले आहे, जे आफ्रिकेला या विशाल धावसंख्येखाली रोखण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT