goa senior womens team  dainik gomantak
गोंयचें खेळामळ

Domestic Cricket Season Schedule: टी-20 अन् वनडे क्रिकेटचा रंगणार थरार; गोव्याच्या महिलांची ऑक्टोबरपासून 'मोहीम'

गोमन्तक डिजिटल टीम

देशांतर्गत क्रिकेटमधील आगामी 2024-25 मोसमात गोव्याच्या सीनियर महिला संघाची मोहीम ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. संघ टी-20 व एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नियोजित वेळापत्रकानुसार, गोव्याची सीनियर महिला क्रिकेट संघ 17 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 स्पर्धेत खेळेल.

गोव्याचा अ गटात समावेश असून आठ संघांच्या या गटात मुंबई (Mumbai), आंध्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, जम्मू-काश्मीर, मिझोराम हे अन्य संघ आहेत. या गटातील सामने गुजरातमधील बडोदा येथे खेळले जातील.

दरम्यान, सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील गटसाखळी सामने 4 ते 16 डिसेंबर या कालावधीत होतील. गोव्याचा क गटात समावेश असून दिल्ली, तामिळनाडू (Tamil Nadu), मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, मणिपूर हे अन्य संघ आहेत. या गटातील सर्व सामने चंडीगड येथे होणार आहेत.

याशिवाय, महिला गटात 19 वर्षांखालील टी-20 स्पर्धेतील गटसाखळी सामने 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत, तर एकदिवसीय स्पर्धेतील सामने 4 ते 12 जानेवारी या कालावधीत होतील.

23 वर्षांखालील वयोगटात टी-20 गटवार स्पर्धा 5 ते 12 जानेवारी या कालावधीत, तर एकदिवसीय स्पर्धा 5 ते 13 मार्च या कालावधीत खेळले जातील. 15 वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेतील गट सामने 21 ते 29 नोव्हेंबर या दरम्यान होतील.

गतमोसमातील कामगिरी

गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने गतमोसमात एकदिवसीय स्पर्धेतील क गटात सहापैकी चार सामने जिंकले, तर दोन पराभव पत्करले. सात संघांच्या गटात त्यांना 16 गुणांसह चौथा क्रमांक मिळाला. टी-20 स्पर्धेतील ड गटात सहा सामन्यांत प्रत्येकी तीन विजय व पराभव नोंदविले. संघ 12 गुणांसह सात संघांत पाचव्या स्थानी राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलीसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

SCROLL FOR NEXT