National Badminton Championship Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Badminton Championship: राष्ट्रीय एकेरीत सुवर्ण जिंकणारी पहिली गोमंतकीय; 10 वर्षांच्या अमायरा धुमटकरचा ऐतिहासिक पराक्रम

First National Singles Badminton Title : गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने ऐतिहासिक कामगिरी साधताना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने ऐतिहासिक कामगिरी साधताना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या मिनी (११ वर्षांखालील) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत अमायराने कर्नाटकच्या ज्योत्स्ना विनोद हिचा १५-११, १५-९ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.

गोव्याला राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनमध्ये कोणत्याही एकेरी गटात पहिले विजेतेपद मिळवून देण्याचा मान अमायरा हिने पटकावला. अवघ्या १० वर्षांच्या अमायराने भारतातील या वयोगटातील अव्वल क्रमांकाची खेळाडू असल्याचे आपल्या खेळातून सिद्ध केले. गेल्या वर्षी बडोदा येथे झालेल्या स्पर्धेत तिने ब्राँझपदक जिंकले होते. यंदा त्या कामगिरीचे सुवर्णपदकात रूपांतर केले.

ऑलिंपिकचे स्वप्न

गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी अमायरा हिच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले आहे. तिची समर्पित वृत्ती आणि कुटुंबाच्या मोठ्या त्यागामुळे हे यश साध्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचे ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अमायरा हिने बाळगले आहे, त्यासाठी तिला पुरस्कर्त्यांचा भरघोस पाठिंबा आवश्यक आहे. स्वप्नपूर्तीसाठी अमायराला कॉर्पोरेट पाठबळ लाभावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

जबरदस्त सातत्यपूर्ण प्रगती : अमायरासाठी २०२६ वर्ष सफल ठरले आहे. मुंबई येथे २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अखिल भारतीय सब-ज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत तिने तेलंगणाच्या साईना शर्मा हिच्या साथीने १३ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे विजेतेपदही पटकावले होते. त्यानंतर आता रायपूर येथे ११ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत मुलींच्या एकेरीचे सुवर्णपदक जिंकत तिने आपल्या यशस्वी कारकिर्दीत मानाचा तुरा खोवला. गतवर्षी तिने ११ वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत ब्राँझपदक प्राप्त केले होते.

‘‘गोव्याची युवा बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने ११ वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून गोव्यासाठी नवा इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण गोव्याची मान अभिमानाने उंचावली आहे. राज्यातील उदयोन्मुख युवा खेळाडूंसाठी ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! भविष्यातही अशीच उत्तुंग यश संपादन करून अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवावेस. संपूर्ण गोव्याला तुझा अभिमान आहे!’’

- डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Decision Making Skills: निर्णय घेताय? थोडं थांबा, आधी स्वतःला विचारा हा एक प्रश्न!

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला धक्का? जसप्रीत बुमराहने नाकारली उपकर्णधारपदाची ऑफर; काय आहे नेमके कारण?

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

SCROLL FOR NEXT