Goa Cricket Association  GCA
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: कामगिरीमुळे तरन्नुम संघात कायम; नवी अष्टपैलू प्रीतीही खेळणार

Goa Cricket Ladies Team: गोव्याच्या सीयर महिला क्रिकेट संघात तरन्नुम पठाण कायम, मध्य प्रदेशची डावखुरी प्रीती यादव पाहुणी क्रिकेटपटू

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बडोद्याची तरन्नुम पठाण गतमोसमात गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघातून खेळताना लक्षवेधक ठरली. त्या कामगिरीची दखल घेत गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) आगामी २०२४-२५ मोसमासाठी तिला संघात कायम राखले असून मध्य प्रदेशची डावखुरी प्रीती यादव अष्टपैलू नवी पाहुणी क्रिकेटपटू असेल.

‘जीसीए’ व्यवस्थापकीय समिती बैठकीत सीनियर महिला संघातील दोन्ही पाहुण्या क्रिकेटपटूंच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. गतमोसमात तरन्नुम आणि मध्य प्रदेशची प्रियांका कौशल गोव्यातर्फे खेळली होती, परंतु प्रियांकाला अपेक्षित कामगिरी जमली नाही.

तिची जागा आता मध्य प्रदेश संघातील खेळाडू असलेल्या २८ वर्षीय प्रीती हिने घेतली आहे. प्रीती डावखुरी बॅटर व बॉलर आहे. जीसीएने सीनियर महिला क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी संघटनेचे महिला क्रिकेट संचालक सर्वेश नाईक यांनाही कायम ठेवले आहे.

यावेळची मोहीम ऑक्टोबरपासून

गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाची आगामी मोसमातील मोहीम ऑक्टोबरपासून सुरू होईल. संघ अगोदर १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या सीनियर महिला टी-२० स्पर्धेत खेळेल. नंतर सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत ४ ते १६ डिसेंबर या कालावधीत खेळेल. गतमोसमातील सीनियर टी-२० स्पर्धेत गोव्याने सहा लढतीत तीन विजय व तीन पराभव अशी, तर एकदिवसीय स्पर्धेतील सहा सामन्यांत चार विजय व दोन पराभव अशी कामगिरी नोंदविली होती. अष्गतवर्षी गोव्याचा सीनियर महिला क्रिकेट छत्तीसगडमधील निमंत्रित संघांच्या स्पर्धेत खेळला होता व त्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.

गतमोसमात अष्टपैलू कामगिरी

गतमोसमातील (२०२३-२४) गोव्यातर्फे सीनियर महिला टी-२०, तसेच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेत ३० वर्षीय तरन्नुम हिने शानदार अष्टपैलुत्व प्रदर्शित केले होते. ती मध्यफळीतील बॅटर असून ऑफस्पिन बॉलर आहे. गतमोसमातील टी-२० स्पर्धेत तरन्नुमने सहा सामन्यांत ९९ धावा केल्या, तसेच पाच गडी बाद केले. एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील सहा सामन्यांतील पाच डावात तरन्नुमने एका अर्धशतकासह ६७.५च्या सरासरीने १३५ धावा केल्या, शिवाय आठ विकेटही टिपल्या. तिने या स्पर्धेत राजस्थानविरुद्ध नाबाद ५२, तर महाराष्ट्राविरुद्ध ४५ धावा केल्या होत्या. महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये ती गुजरात टायटन्सतर्फेही खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT