Women's T20 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Women's T20 Cricket: 112 धावांचे आव्हान राखले; शिखा-श्रेया चमकल्या, गोव्याचा छत्तीसगडवर रोमहर्षक विजय!

Goa vs Chhattisgarh: गोव्याने सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत सोमवारी छत्तीसगडवर आठ धावांनी विजय मिळविला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याने सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत सोमवारी छत्तीसगडवर आठ धावांनी विजय मिळविला. एलिट अ गटात त्यांनी जिंकलेला हा तिसरा सामना ठरला. विजयात सामन्याची मानकरी शिखा पांडे, तसेच श्रेया परब यांची शानदार गोलंदाजी निर्णायक ठरली.

गुजरातमधील सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गोव्याने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सर्वबाद ११२ धावा केल्या. गोव्याच्या डावात तेजस्विनी दुर्गड व शिखा पांडे यांनी प्रत्येकी २७, तर पूर्वजा वेर्लेकरने २२ धावा केल्या. नंतर शिखा पांडे, श्रेया परब व पूर्वा भाईडकर यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर छत्तीसगडला २० षटकांत ९ बाद १०४ धावांत रोखले.

शिखाने चार षटकांत फक्त दहा धावा दिल्या, श्रेयाने १४ धावांत ३, तर पूर्वाने २२ धावांत २ गडी टिपले. कर्णधार सुनंदा येत्रेकरने अखेरच्या षटकात फक्त सात धावा देत गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेत गोव्याने जम्मू-काश्मीर, चंडीगड व आता छत्तीसगडला नमवून गुणसंख्या १२ वर नेली. त्यांना कर्नाटक व बंगालविरुद्ध हार पत्करावी लागली. गोव्याचा पुढील सामना ४ नोव्हेंबरला आसामविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा : १९.१ षटकांत सर्वबाद ११२ (हर्षिता यादव ६, पूर्वजा वेर्लेकर २२, श्रेया परब ०, तेजस्विनी दुर्गड २७, शिखा पांडे २७, विनवी गुरव ५, पूर्वा भाईडकर १२, सुनंदा येत्रेकर ४, मेताली गवंडर ३, तनया नाईक ०, हर्षदा कदम नाबाद ०, प्रीती यादव ३.१-०-१३-३, ऊर्मिला हरिना ४-२-१०-२, आन्शी अग्रवाल ४-०-२९-३) वि. वि. छत्तीसगड : २० षटकांत ९ बाद १०४ (सृष्टी शर्मा २८, कृती गुप्ता २८, शिवानी कृष्णा २२, शिखा पांडे ४-०-१०-०, पूर्वा भाईडकर ४-०-२२-२, श्रेया परब ४-०-१४-३, सुनंदा येत्रेकर ४-०-२८-१, पूर्वजा वेर्लेकर १-०-७-०, तेजस्विनी दुर्गड ३-०-२१-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: लाचखोरी, कोठडीतील मारहाण ते लैंगिक अत्याचाराचे आरोप; गोव्यात 10 महिन्यांत 26 पोलिस निलंबित!

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाला एक वर्ष पूर्ण; रिपोर्ट कधी येणार अन् कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात लाभ कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण टाइमलाइन

Daily Protein Requirement: रोज किती प्रोटीन खाणं आवश्यक? वयानुसार ठरते शरीराची गरज; 30 किलो वजन असल्यास किती ग्रॅम प्रोटीन घ्यावे?

Goa PF Registration: सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 2,220 जणांना पीएफ आणि विमा योजनेचा लाभ

Goa Agriculture Udate: काटेकणगीच्या शेतीला ग्रहण! लागवड वाढली, तरी उत्पादन घटले; दिवाळीच्या मागणीवर परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT