Goa vs Madhya Pradesh Ranji Trophy, Rajat Patidar news, Ranji Trophy 2025 match Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy 2025: रजत पाटीदारला रोखण्यासाठी 'मास्टरप्लॅन'! गोवा संघात खास गोलंदाजाची एन्ट्री, फलंदाजाची धाकधूक वाढली

Goa vs Madhya Pradesh Ranji Trophy: रणजी करंडकाच्या एलिट ब गटात प्रत्येकी तीन सामन्यानंतर गोवा ११ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर तिन्ही सामने अनिर्णित राहिलेल्या मध्य प्रदेशचे नऊ गुण आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रणजी करंडक क्रिकेट एलिट ब विभागीय स्पर्धेतील अगोदरच्या तीन सामन्यात संघात नसलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याला पुनरागमनाची संधी लाभली आहे. मध्य प्रदेशविरुद्ध शनिवारपासून (ता. ८) पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर होणाऱ्या लढतीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) गुरुवारी सोळा सदस्यीय संघ जाहीर केला. त्यात सलामीचा ईशान गडेकर व मध्य फळीतील कश्यप बखले या फलंदाजांना स्थान मिळाले नाही.

रणजी करंडकाच्या एलिट ब गटात प्रत्येकी तीन सामन्यानंतर गोवा ११ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर तिन्ही सामने अनिर्णित राहिलेल्या मध्य प्रदेशचे नऊ गुण आहेत.

पाहुणा संघ गोव्यात दाखल झाला असून आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (आरसीबी) कर्णधार कसोटीपटू खेळाडू रजत पाटीदार गोव्याविरुद्ध मध्य प्रदेशचे नेतृत्व करणार आहे. ते पूर्ण ताकदीनिशी गोव्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ संघात स्थान न मिळाल्याने रजत मध्य प्रदेश संघात दाखल झाला आहे.

गोव्याच्या संघात पुन्हा स्थान मिळालेला २९ वर्षीय अमूल्य २९ रणजी सामने खेळला असून त्याने ५३ गडी बाद केले आहेत. जानेवारी २०२५ मध्ये नागालँडविरुद्ध सोविमा येथे तो रणजी करंडक प्लेट विभागीय अंतिम लढत खेळला होता, मात्र यंदा सुरवातीच्या तीन सामन्यांसाठी त्याला संघात स्थान मिळाले नव्हते.

कर्नाटक व पंजाबविरुद्धच्या लढतीसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय संघातील कश्यप याला चंडीगडविरुद्ध पर्वरी येथील पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती, पण तो शून्यावर बाद झाला. डावखुरा सलामी फलंदाज मंथन खुटकर याने दोन चमकदार अर्धशतकांसह छाप पाडल्यामुळे ईशानला आता संघाबाहेर जावे लागले आहे.

गोव्याचा संघ

मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, दीपराज गावकर, दर्शन मिसाळ, स्नेहल कवठणकर (कर्णधार), मोहित रेडकर, समर दुभाषी, हेरंब परब, अभिनव तेजराणा, अर्जुन तेंडुलकर, ललित यादव (उपकर्णधार), अमूल्य पांड्रेकर, राजशेखर हरिकांत, वासुकी कौशिक, विजेश प्रभुदेसाई, विकास सिंग.

मध्य प्रदेशचा संघ

रजत पाटीदार (कर्णधार), शुभम शर्मा, यश दुबे, हर्ष गवळी, हिमांशू मंत्री, व्यंकटेश अय्यर, हरप्रीत सिंग, सारांश जैन, सागर सोळंकी, कुमार कार्तिकेय, अधीर प्रताप सिंग, कुलदीप सेन, अर्शद खान, अनुभव अगरवाल, आर्यन पांडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT