Goa vs Assam Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa vs Assam: गोव्याचे फलंदाज मोठ्या खेळीपासून वंचित, आसामविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 218 धावा

Goa Under 19 Cooch Behar match: गोव्याच्या फलंदाजांना चांगला जम बसत असताना मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या फलंदाजांना चांगला जम बसत असताना मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही, परिणामी यजमान संघाला आसामविरुद्धच्या कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर रविवारी ४ बाद २१८ धावांची मजल मारता आली.

स्पर्धेच्या एलिट ड गटातील चार दिवसीय सामना रविवारपासून पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू झाला. गोव्याच्या डावात कर्णधार यश कसवणकर (६०, ११४ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) याने अर्धशतक नोंदविले, तर शंतनू नेवगी (४९, १२९ चेंडू, ६ चौकार) याचे अर्धशतक एका धावेने हुकले.

यश व शंतनू यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी, आदित्य कोटा (३८, १२७ चेंडू, ४ चौकार) व सार्थक भिके (३२, ६८ चेंडू, ५ चौकार) यांनी गोव्याला २२.३ षटकांत ५५ धावांची सावध सलामी दिली.

मागील लढतीत छत्तीसगडविरुद्ध द्विशतक केलेल्या यश याला रविवारी आणखी एका शतकी खेळीची संधी होती, पण मध्यमगती गोलंदाज अमित चौधरी याच्या गोलंदाजीवर त्याने दीपंकर पॉल याच्या हाती झेल दिला..

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ९० षटकांत ४ बाद २१८ (आदित्य कोटा ३८, सार्थक भिके ३२, शंतनू नेवगी ४९, यश कसवणकर ६०, दिशांक मिस्कीन नाबाद २६, आराध्य गोयल नाबाद ६, अमित चौधरी १-३६, मोहित ठाकूर २-४२, पृथ्वीराज कश्यप १-३२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT