Goa Road Closure: दाबोळी-वेर्णा वाहतूक वळविली, 29 पासून कार्यवाही; कुठ्ठाळी-चिखली महामार्गावरून अवजड वाहतूक

Goa traffic diversion 29 November: बोगमाळो चौक ते वालीस चौक दरम्यानच्या उड्डाण पुलावर प्रीकास्ट गर्डर्सच्या कामासाठी हा मार्ग सहा महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
Goa Road Closure
Goa Road ClosureDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बोगमाळो चौक ते वालीस चौक दरम्यानच्या उड्डाण पुलावर प्रीकास्ट गर्डर्सच्या कामासाठी हा मार्ग सहा महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. यासाठी वाहतूक विभागाने सर्व तयारी केली असून २९ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता हा रस्ता बंद करण्यात येणार आहे.

मात्र या मार्गाला जोणाऱ्या अंतर्गत रस्त्याचा वापर हलक्या वाहनांना करता येईल तर अवजड वाहनांना वेर्णा तिठ्यावरुन कुठ्ठाळी चौकत येऊन कुठ्ठाळी ते चिखली हा महामार्ग क्रमांक ३६६ (जुना १७ अ) चा वापर करावा लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक फुर्तादो यांनी नोटीस काढली आहे.

Goa Road Closure
Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

बोगमाळो चौक ते एमईएस चौक दरम्यान उड्डाण पुल बांघण्याचे काम सुरु आहे. तसेच क्वीनीनगर येथे वेव्हिकुलर अंडरपास बाधण्यात येत आहे. एमईएस ते वालीस चौक दरम्यानच्या उड्डाण पुल खांबाच्या उंचीबद्दल तांत्रिक समस्या निर्माण झाली होती.

त्यामुळे काहीजणांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी भारतीय नौदलाची परवानगी घेण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले होते. त्यामुळे या खांबांची उंची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या बोगमाळो चौक ते वालिस चौक दरम्यानच्या उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तेथे आता प्रीकास्ट गर्डर्स घालण्यात येणार आहेत. यासाठी लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व काम जलद गतीने व्हावे यासाठी हा रस्ता २०नोव्हेंबर ते २१ मेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

अशी असेल नवी वाहतूक व्यावस्था

बोगमाळो चौक ते वालीस चौक रस्ता बंद करण्यात आल्यावर हलक्या वाहनधारकांना तसेच या मार्गावरील मिनी बसचालकांना विशाल मार्ट समोरच्या अंतर्गत रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यासंबंधीचे मार्गदर्शक फलक तेथे उभारण्यात येणार आहेत.

मडगावहून वास्कोकडे येणाऱ्या वाहनांना कुठ्ठाळी चौकात जाऊन कुठ्ठाली ते चिखली चौक दरम्यानच्या महामार्गाचा उपयोग करावा लागेल.

मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना दाबोळी येथे पोहल्यावर भारतीय नौदलाच्या ‘हंस ‘ चौकातून वळण घेऊन पुढे जावे लागणार आहे.

मुरगाव बंदरातून वास्को बाहेर जाणाऱ्या अवजड वाहनांना दाबोळी विमानतळासमोरील रस्त्यावरून चिखली चौकाकडे जावे लागणार. तेथून कुठ्ठाळी चौकाकडे जातील.

Goa Road Closure
Goa Politics: 'त्यांना जर जवळ केले तर लोक काय म्हणतील'? फुटिरांच्या विरोधात LOP आलेमाव यांचा सवाल; इजिदोरच्या फॉरवर्ड प्रवेशावर नाराजी

बोगमाळो ते वालीस चौकातील वाहतूक वळविण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांनी चिखली ते कुठ्ठाळी महामार्गाचा वापर करणे अतिशय सोईस्कर होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहनधारकांनी अधिक माहितीसाठी वास्को वाहतूक पोलिस कक्षाकडे किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गोवा विभाग, प्रकल्प कंत्राट कंपनीचे अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com