Vijay Merchant Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Merchant Trophy: फॉलोऑननंतर गोवा पराभवाच्या दिशेने, फलंदाजांची खराब कामगिरी

Goa Cricket: गोव्याच्या १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या कमजोर फलंदाजीचे पुन्हा एक प्रदर्शन घडले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या कमजोर फलंदाजीचे पुन्हा एक प्रदर्शन घडले. त्यामुळे विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात फॉलोऑननंतर ते सलग दुसऱ्या पराभवाच्या दिशेने आहेत.

छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बडोद्याने पहिला डाव ८ बाद ३९९ धावांवर घोषित केला. नंतर गोव्याचा डाव १२१ धावांत संपुष्टात आला.

बडोद्याला २७८ धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यांनी गोव्यावर फॉलोऑन लादला. गोव्याची दुसऱ्या डावातही शनिवारी दिवसअखेर ३ बाद ५१ अशी घसरगुंडी उडाली, ते अजून २२७ धावांनी मागे आहेत.

संक्षिप्त धावफलक ः बडोदा, पहिला डाव ः ८ बाद ३९९ घोषित.

गोवा, पहिला डाव ः ५१.१ षटकांत सर्वबाद १२१ (अदीप मिस्कीन ७, जेडन परेरा २७, साईराज गोवेकर ०, विनीत कामत ८, महंमद उझैर ६, आशुतोष शेट्टी १, शौनक तेली २९, मृणाल नाईक ५, अनुराग बहादूर ९, सारंग गोवेकर १८, संकल्प नाईक नाबाद ०, युवराज सिंह ३-३७, मलिकेश २-२१, जैनम पटेल २-३, तिलक पटेल ३-२५).

गोवा, दुसरा डाव (फॉलोऑन) ः २१ षटकांत ३ बाद ५१ (अदीप मिस्कीन २४, जेडन परेरा १०, साईराज गोवेकर १०, मृणाल नाईक नाबाद १, अनुराग बहादूर नाबाद ०, युवराज सिंह २-९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT