Snehal Kauthankar Triple Century In Ranji Trophy  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: अरुणाचल विरुद्ध गोव्याच्या स्नेहालची धुवांधार बॅटिंग; सगुणनंतर त्रिशतक झळकावणारा एकमेव फलंदाज

Snehal Kauthankar Triple Century: यापूर्वी मिझोराम विरुद्ध स्नेहल कवठणकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे द्विशतक नोंदवले होते

Akshata Chhatre

पर्वरी: अरुणाचल प्रदेश आणि गोवा यांच्यामध्ये रंगलेल्या रणजी क्रिकेट सामन्यात विरोधी संघासमोर गोव्याच्या स्नेहल कवठाणकरने गुरुवार (दि. 14 नोव्हेंबर) रोजी त्रिशतक झळकावले. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्रिशतक झळकावणाऱ्या सगुण कामत (नाबाद 304) नंतर स्नेहल हा त्रिशतची खेळी रंगवणारा गोव्याचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

अरुणाचलच्या हल्ल्याविरुद्ध केवळ 205 चेंडूत स्नेहलने त्रिशतक झळकावले असून यात 43 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. स्नेहलच्या मागोमाग कश्यप बखले देखील त्रिशतक खेळण्याच्या मार्गावर आहे. कश्याप बखले आणि स्नेहल कवठाणकर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 577 धावांची भागीदारी करत रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी सगळ्यात मोठी पार्टनरशिप केली आहे.

यापूर्वी मिझोराम विरुद्ध स्नेहल कवठणकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे द्विशतक नोंदवले होते आणि आता अरुणाचल प्रदेश विरोधात पुन्हा द्विशतक खेळून त्यांने रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या संघातून सलग द्विशतक खेळणारा पहिला खेळाडू असल्याचा मान देखील मिळवला आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील अतिशय कमजोर अरुणाचल प्रदेशभोवती गोव्याने चार दिवसीय सामन्याच्या पहिल्याच दिवशी फास आवळला. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर यजमान संघाला आता लढतीच्या दुसऱ्याच दिवशी दणदणीत विजय नोंदविण्याची संधी मिळाली आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 25 धावांत टिपलेल्या पाच बळींमुळे गोव्याने अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 84 धावांत धुव्वा उडविला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकवेळ त्यांची 5 बाद 36 धावा अशी खूपच दयनीय स्थिती होती. अर्जुनच्या पाच विकेटव्यतिरिक्त गोव्यातर्फे ऑफस्पिनर मोहित रेडकर याने तीन, तर पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याने दोन गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय; कॉन्स्टेबल पत्नीने पती आणि घरातील कामवालीचे केले अपहरण

Ravi Naik: रवि नाईक 'गुन्हेगारांना संभाळावे लागते' हे खोटं ठरवणारा 'गुन्हेगारांचा कर्दनकाळ' - संपादकीय

Goa Politics: खरी कुजबुज, गुन्हेगारांचा कर्दनकाळ गेला; एकच चर्चा

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने करमळीत एक ठार

Goa Politics: रवि यांच्या जागी कोण? 6 महिन्यांत पोटनिवडणूक, 'मगो'चा पाठिंबा पुत्र रितेशला

SCROLL FOR NEXT