Ranji Trophy: गोव्याला दुसऱ्याच दिवशी दणदणीत विजयाची संधी! 'तेंडुलकर'च्या पाच विकेटनंतर 'कश्यप', 'स्नेहल' यांची शतके

Ranji Trophy 2024: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील अतिशय कमजोर अरुणाचल प्रदेशभोवती गोव्याने चार दिवसीय सामन्याच्या पहिल्याच दिवशी फास आवळला.
Ranji Trophy 2024 Goa Vs Arunachal Pradesh
Ranji Trophy 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy 2024 Goa Vs Arunachal Pradesh

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील अतिशय कमजोर अरुणाचल प्रदेशभोवती गोव्याने चार दिवसीय सामन्याच्या पहिल्याच दिवशी फास आवळला. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर यजमान संघाला आता लढतीच्या दुसऱ्याच दिवशी दणदणीत विजय नोंदविण्याची संधी आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना २५ धावांत टिपलेल्या पाच बळींमुळे गोव्याने अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव अवघ्या ८४ धावांत धुव्वा उडविला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकवेळ त्यांची ५ बाद ३६ धावा अशी खूपच दयनीय स्थिती होती. अर्जुनच्या पाच विकेटव्यतिरिक्त गोव्यातर्फे ऑफस्पिनर मोहित रेडकर याने तीन, तर पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याने दोन गडी बाद केले.

सलग दुसऱ्या सामन्यात शतक केलेल्या स्नेहल कवठणकर (नाबाद १४६, १०० चेंडू, २१ चौकार) याने आणखी एक शतकवीर कश्यप बखले (नाबाद १७९, १५६ चेंडू, २४ चौकार, २ षटकार) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी २९३ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे गोव्याने बुधवारी पहिल्या दिवसअखेर ५४ षटकांतच २ बाद ४१४ धावा करून ३३० धावांची प्रचंडी आघाडी संपादन केली.

पुनरागमन करणारा ईशान गडेकर तीन धावांवर बाद झाल्यामुळे कमजोर संघाविरुद्ध मोठी खेळी करण्याची संधी त्याने गमावली. दुखापतीनंतर संघात आलेल्या सुयश प्रभुदेसाईने ६४ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. त्याने कश्यपसह दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली.

Ranji Trophy 2024 Goa Vs Arunachal Pradesh
Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

संक्षिप्त धावफलक

अरुणाचल प्रदेश, पहिला डाव ः ३०.३ षटकांत सर्वबाद ८४ (नीलम ओबी २२, सिद्धार्थ बलोडी १६, नबम अबो नाबाद २५, लक्षय गर्ग ८-५-१२-०, अर्जुन तेंडुलकर ९-३-२५-५, कीथ पिंटो ७.३-१-३१-२, मोहित रेडकर ६-२-१५-३).

गोवा, पहिला डाव ः ५४ षटकांत २ बाद ४१४ (ईशान गडेकर ३, सुयश प्रभुदेसाई ७३, कश्यप बखले नाबाद १७९, स्नेहल कवठणकर नाबाद १४६, निया याब १-५०, जय भावसार १-९२).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com