Abhinav Tejarana Captaincy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

Abhinav Tejarana Goa Captain: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोहिमेत गोव्याला नवा कर्णधार लाभू शकतो, तसे झाल्यास डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याला पसंती असेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोहिमेत गोव्याला नवा कर्णधार लाभू शकतो, तसे झाल्यास डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याला पसंती असेल. संघाचा एलिट अ गटातील पहिला सामना रविवारपासून (ता. ११) बडोद्याविरुद्ध कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल.

मोसमपूर्व स्पर्धांत गोव्याचा संघ मागील काही सामन्यांत अभिनवच्या नेतृत्वाखाली खेळला होता. या डावखुऱ्या २५ वर्षीय फलंदाजाने गतमोसमात पदार्पण करताना सात सामन्यांत ७८८ धावा केल्या होत्या. यंदा ओमान दौऱ्यात, तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील स्पर्धेतही त्याने फलंदाजीतील फॉर्म कायम राखला होता. अभिनवची कर्णधारपदी निवड झाल्यास तो गतमोसमातील कर्णधार स्नेहल कवठणकर याची जागा घेईल. तसे झाल्यास ३० वर्षीय अनुभवी स्नेहल संघातील प्रमुख फलंदाज या नात्याने खेळेल.

गतमोसमात रणजी करंडक स्पर्धेत चंडीगडविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय नोंदविताना दीपराज गावकर याने गोव्याचे नेतृत्व केले होते. त्यानंतर स्नेहल कवठणकर संघात परतल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली गोव्याने दोन अनिर्णित व सलग चार पराभव अशी कामगिरी साधली होती.

पहिल्या सामन्यासाठी गोव्याचा संघ १५ अथवा १६ सदस्यीय असल्यास मोठे बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. ललित यादव, वासुकी कौशिक आणि अर्जुन तेंडुलकर हे संघातील पाहुणे क्रिकेटपटू आहेत. युवा खेळाडू यश कसवणकर याची कामगिरी गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. सराव स्पर्धांत उल्लेखनीय ठरलेला वेगवान ऋत्विक नाईक संघात आल्यास नवल वाटू नये.

यष्टिरक्षकांत शिवेंद्र आघाडीवर

ओमान, कर्नाटक व महाराष्ट्र दौऱ्यात २३ वर्षीय शिवेंद्र भुजबळ याने सातत्यपूर्ण फलंदाजी केली, त्यामुळे संघ निवडीत त्याला प्राधान्यक्रम मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरा यष्टिरक्षक निवडायचा असल्यास राजशेखर हरिकांत व पियुष यादव यांच्यात चढाओढ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनलसाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

Narendra Modi Journey: 7 ऑक्टोबर 2001 ते मोदी पर्वाची 25 वर्षे; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, विकासाच्या दाव्यांपासून रोजगार-लोकशाहीवरील प्रश्नांपर्यंत

DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

SCROLL FOR NEXT