Goa Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji: गोवा 4 प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजयाच्या प्रतीक्षेत; कर्नाटक, केरळविरुद्ध पराभवांची संख्या जास्त

Goa Cricket: गोव्याच्या स्पर्धेतील मोहिमेस १५ ऑक्टोबरपासून चंडीगडविरुद्धच्या लढतीने सुरवात होईल. या संघाविरुद्ध यापूर्वीचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत.

Sameer Panditrao

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२५-२६ मोसमातील एलिट ब गटात प्रतिस्पर्धी असलेल्या सातपैकी चार संघांविरुद्ध गोव्याला विजयाची प्रतीक्षा असून कर्नाटक व केरळविरुद्ध पराभवांची संख्या जास्त आहे.

गोव्याच्या स्पर्धेतील मोहिमेस १५ ऑक्टोबरपासून चंडीगडविरुद्धच्या लढतीने सुरवात होईल. या संघाविरुद्ध यापूर्वीचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र व मध्य प्रदेशविरुद्ध प्रत्येकी तीन, तर पंजाबविरुद्ध दोन लढतीत गोव्याचा संघ विजय नोंदवू शकलेला नाही.

प्रतिस्पर्धी केरळविरुद्ध तीन, तर सौराष्ट्र व कर्नाटकविरुद्ध गोव्याने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आगामी रणजी मोसमात गोव्याचा संघ चंडीगड, मध्य प्रदेश व केरळविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे.

गतमोसमात रणजी करंडक स्पर्धेत उपविजेतेपद मिळालेल्या केरळविरुद्ध गोव्याचा अखेरचा सामना जानेवारी २०२३ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला होता, तेव्हा दर्शन मिसाळच्या नेतृत्वाखालील संघाने सात विकेट राखून विजय नोंदविला होता. मात्र केरळविरुद्धच्या एकूण २६ रणजी लढतीत गोव्याचे ११ पराभव आहेत.

कर्नाटकविरुद्ध गोव्याचे १९ सामने झाले आहेत, त्यापैकी १३ लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. एकमेव विजय व्ही. बी. चंद्रशेखर याच्या नेतृत्वाखाली तत्कालीन रणजी विजेत्यांविरुद्ध कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर नोंदविला होता.

ऑक्टोबर १९९६ मध्ये गोव्याने बलाढ्य कर्नाटकवर डाव व ८१ धावांनी विजय नोंदवून इतिहास रचला होता. गोव्याचा तो रणजी करंडक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. कर्नाटकविरुद्ध म्हैसूर येथे जानेवारी २०२४ मध्ये झालेला गोव्याचा अखेरचा सामना अनिर्णित राहिला होता.

सौराष्ट्रविरुद्धच्या पाच लढतीपैकी एकमात्र विजय गोव्याने डिसेंबर २००२ मध्ये नोंदीत केला होता. तेव्हा राजकोट येथे झालेली लढत गोव्याने ९० धावांनी जिंकली होती. मात्र दोन लढतीत पराभव पत्करावा लागला. सौराष्ट्रविरुद्धचा गोव्याचा अखेरचा सामना मार्च २०२२ मध्ये अहमदाबाद येथे झाला होता, तेव्हा सौराष्ट्रने २११ धावांची प्रचंड विजय संपादन केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Ind vs Pak: मैदानावर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा, पाकिस्तानी गोलंदाजानं डोळं वटारुन पाहिलं; पण धाकड हरमननंही दिलं चोख प्रत्युत्तर Watch Video

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Illegal Beef Trafficking: गोवा-कर्नाटक सीमेवर गोवा पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 1200 किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT