Khelo India Beach Games 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Khelo India Beach Games 2026: गोव्याची कामगिरी सुधारली, खेलो इंडिया बीच गेम्समध्ये एका सुवर्णासह चार पदके

Khelo India Beach Games: खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीत यंदा गोव्याची कामगिरी सुधारली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीत यंदा गोव्याची कामगिरी सुधारली. बीच व्हॉलिबॉलमधील सुवर्णपदकासह एकूण चार पदके जिंकून राज्याने पदकतक्त्यातील २६ संघांत पंधरावा क्रमांक पटकावला.

दीव येथे झालेल्या स्पर्धेत गोव्याला एक सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझ अशी एकूण चार पदके मिळाली. गतवेळी गोव्याला तीन पदके मिळाली होती व अठरावा क्रमांक मिळाला होता. यावेळी बीच व्हॉलिबॉलमध्ये प्रबळ सावंत व तेजस गावस या गोव्याच्या जोडीने पुरुष गटात विजेतेपदासह सुवर्णपदक प्राप्त केले.

या खेळात ब्राँझपदक थोडक्यात हुकले. अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्हो यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याच्या बीच सॉकर संघाने सलग दुसऱ्या वर्षी रौप्यपदक जिंकून पदकमालिका कायम राखली.

गोव्याला दोन ब्राँझपदके पेंचाक सिलाट व सेपाक टाक्रो या खेळात मिळाली. पेंचाक सिलाटमध्ये महिलांच्या टॅंडिंग प्रकारातील ५५ किलो वजनगटात परमेश चौहान ही ब्राँझपदकाची मानकरी ठरली. सेपाक टाक्रो खेळात महिलांच्या ट्रायो टीम प्रकारात गोव्याच्या संघाला उपांत्य फेरीत पश्चिम बंगालविरुद्ध हार पत्करावी लागली. त्यामुळे ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

क्रीडामंत्री तवडकर यांनी केले कौतुक

दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये पदके जिंकलेल्या गोव्याच्या क्रीडापटूंना बुधवारी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सन्मानीत केले. खेळाडूंची कामगिरी राज्यासाठी गौरवास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पर्वरी विधानसभा संकुलात झालेल्या कार्यक्रमास गोवा फुटबॉल विकास परिषदेचे उपाध्यक्ष धाकू मडकईकर, क्रीडा संचालक अजय गावडे, खेलो इंडिया उच्च कामगिरी संचालक एम. आर. सुमीत, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

Borim Bridge: नव्या बोरी पुलासाठी 1948 कोटी खर्च! शेतकऱ्यांचा विरोध कायम; प्रकल्प 3 वर्षांत होणार पूर्ण

Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT