Borim Bridge: नव्या बोरी पुलासाठी 1948 कोटी खर्च! शेतकऱ्यांचा विरोध कायम; प्रकल्प 3 वर्षांत होणार पूर्ण

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला १९४८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक व प्रकल्पाचा संपूर्ण अहवाल सादर केला आहे.
Borim Bridge
Borim BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: आठ किलोमीटर अंतराच्या नवीन बोरी पुलासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला १९४८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक व प्रकल्पाचा संपूर्ण अहवाल सादर केला आहे.

हा चार पदरी व केबल वरील पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६६ वर बांधण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालय करणार असल्याचे समजते. सुरवातीला हा पूल सहा कि. मी. अंतराचा होता आणि त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, परंतु आता खर्च सहा ते सात पट वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी जागा संपादन प्रक्रिया सरकारने निश्चित केली होती. लोटली, बोरी, बांदोडा व कवळे या भागांतून मिळून ३.५ लाख चौरस मीटर जागा संपादन करण्यात आली आहे. या बोरी पूल बांधकामाचा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला जाईल.

सध्या जो बोरी पूल आहे, तो १९८६ साली बांधण्यात आला होता. या ४३१ मीटर लांबीच्या पूलाचे काम १९७७ साली सुरू झाले होते व पूल पूर्ण करण्यास ३०३ लाख रुपये खर्च आले होते.

Borim Bridge
Borim Bridge: बोरी पुलावरील वाहतुकीस अखेर प्रारंभ Video

आता फोंडा-मडगाव मार्गावर वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे व हा पूल मोठ्या प्रमाणात रहदारी झेपवू शकत नाही; त्यामुळे नवीन पूल बांधणे आवश्यक असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा पूल सुद्धा कित्येक वेळा दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवावा लागतो.

सध्या २०.७ कोटी रुपये खर्चून सध्याच्या बोरी पुलाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. ही रक्कम केंद्र सरकारने मंजूर केली आहे असे कळते. यापूर्वी ९.९ कोटी रुपये खर्चून डिसेंबर २०१६ मध्ये पूलाची दुरुस्ती करण्यात आली होती.

Borim Bridge
Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

शेतकऱ्यांचा विरोध कायम

दरम्यान, बोरी पूलाच्या बांधकामासंदर्भात बोलताना स्थानिक शेतकऱ्यांचे नेते आलबर्ट पिन्हेरो यांनी सांगितले की, हा प्रकल्प सध्या न्यायप्रविष्ट आहे. सध्या प्रकरण राष्ट्रीय हरित लवाद व उच्च न्यायालयात आहे. पूलाच्या बांधकामाच्या प्रगतीबाबत माहिती न्यायालयाला कळविल्याशिवाय पुढे जाता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच पर्यावरणीय मान्यतेबाबतही स्पष्टता नाही. शेतकऱ्यांचा नवीन बोरी पुलाला विरोध नाही, परंतु त्यांना पूलाचे बांधकाम शेत व खाजगी जमिनीवर करण्यास विरोध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com