Goa Badminton  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Badminton: म्हापसा शटलर्स बॅडमिंटन स्पर्धेत रितिकाला तिहेरी किताब! शाहीन, अवनीला दुहेरी मुकूट

Goa Badminton Tournament: रितिकाने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत, श्रेया मेहता हिच्यासमवेत मुलींच्या दुहेरीत, तसेच शाहीन याच्यासह मिश्र दुहेरीत बाजी मारली.

Sameer Panditrao

पणजी: म्हापसा शटलर्सतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनियर (१३ वर्षांखालील व १९ वर्षांखालील) मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत रितिका चेल्लुरी हिने तिहेरी किताब जिंकला, तर सी. के. शाहीन व अवनी ख्यालिया यांना दुहेरी किताब प्राप्त झाला. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात झाली.

रितिकाने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत, श्रेया मेहता हिच्यासमवेत मुलींच्या दुहेरीत, तसेच शाहीन याच्यासह मिश्र दुहेरीत बाजी मारली. शाहीन याने १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत अश्विन मन्नाम्बालाथ याच्यासह विजेतेपद प्राप्त केले.

१३ वर्षांखालील मुलींत दुहेरी किताब पटकावलेल्या अवनी हिने एकेरी, तसेच दुहेरीत अमायरा धुमटकर हिच्यासमवेत जेतेपद प्राप्त केले. अन्य गटात १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मायकल मारे, दुहेरीत समर्थ साखळकर व विश्व परब, १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अर्जुन भगत यांनी विजेतेपद मिळविले.

म्हापशाचे उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव प्रवीण शेणॉय, सदस्य नावीद तहसीलदार, प्रशिक्षक रॉय अताईद, म्हापसा शटलर्सचे पदाधिकारी केवल सावंत, व्यंकटेश शेणई, अनिकेत शेणई यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी राज्य बॅडमिंटनमध्ये दीर्घकाळ योगदान दिलेले व्हेटरन्स खेळाडू ॲड. तानाजी सावंत, रामनाथ शेटगावकर, सदानंद तळावलीकर यांना गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Sattari Crime: बिहारच्या व्यक्तीवर गोव्यात अज्ञाताकडून गोळीबार, सत्तरीतील धक्कादायक घटना; परिसरात भीतीचे वातावरण

Elephant in Goa: न्हयेंन बुट्टा, शेतांन लोळ्टा! 'ओंकार' अजूनय तांबोशाच; Watch Video

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

SCROLL FOR NEXT