FC Goa: 'एफसी गोवा' बॅक टू ऍक्शन! AFC चँपियन्स लीगकडे लक्ष; जोरदार सराव सुरु

AFC Champions League: मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने गतमोसमात आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत दुसरा क्रमांक पटकावला होता, तसेच करंडकाची उपांत्य फेरीही गाठली होती.
FC Goa Latest News
FC Goa training camp 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा सुरू होण्याबाबत अजूनही अस्पष्टता आहे, या पार्श्वभूमीवर एफसी गोवा संघाने आगामी एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्ले-ऑफ लढतीसाठी मोसमपूर्व सराव सुरू केला.

मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सलग तिसऱ्या मोसमासाठी सूत्रे स्वीकारली आहेत. एफसी गोवाच्या सोशल मीडिया माहितीनुसार, बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर रविवारी २०२५-२६ मोसमातील पहिले सराव सत्र झाले.

मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने गतमोसमात आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत दुसरा क्रमांक पटकावला होता, तसेच करंडकाची उपांत्य फेरीही गाठली होती. मोसमाअखेरीस एफसी गोवाने सुपर कप जिंकून एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेची पात्रता फेरी गाठली होती.

एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत एफसी गोवाचा १३ ऑगस्ट रोजी फातोर्डा येथे ओमानच्या अल सीब क्लबविरुद्ध सामना होईल.

FC Goa Latest News
Manolo Marquez: प्रशिक्षकपदी मार्केझच! सलग तिसऱ्या मोसमासाठी नियुक्ती; FC Goa साठी विक्रमी कामगिरी

आगामी मोसमासाठी एफसी गोवाने आतापर्यंत डेव्हिड तिमोर, पोल मोरेनो, हावियर सिव्हेरियो या स्पॅनिश फुटबॉलपटूंना करारबद्ध केले असून इकेर ग्वॉर्रोचेना व बोर्हा हेर्रेरा या स्पॅनिश खेळाडूंचा करार वाढविला आहे. सर्बियन देयान द्राझिक हा संघातील सहावा परदेशी खेळाडू आहे. गोमंतकीय मध्यरक्षक हर्ष पत्रे यालाही एफसी गोवाने संघात घेतले आहे. गतमोसमातील कार्ल मॅकह्यू (आयर्लंड), ओडेई ओनाइंडिया (स्पेन), लक्ष्मीकांत कट्टीमणी, रॉलिन बोर्जिस, आरेन डिसिल्वा, जय गुप्ता यांना करारमुक्त केले आहे.

FC Goa Latest News
Inter Kashi FC: ‘इंटर काशी’च आय-लीग विजेते! ‘सीएएस’च्या आदेशानंतर AIFF कडून अधिकृत घोषणा

रॉनी विल्सन संघातील नवा खेळाडू

बचावफळीत नवा युवा फुटबॉलपटू करारबद्ध केल्याची माहिती एफसी गोवाने रविवारी सोशल मीडियावर दिली. त्यानुसार, मेघालयातील शिलाँग येथील २२ वर्षीय सेंटर-बॅक जागी खेळणारा रॉनी विल्सन संघातील नवा चेहरा आहे. आय-लीग स्पर्धेत तो शिलाँग लाजाँगतर्फे खेळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com