Chess Canva
गोंयचें खेळामळ

Goa Chess Tournament: गोव्याच्या एथन, अमेयचा ‘ग्रँडमास्टर’ना दे धक्का; चलाख खेळीने दिली मात

Goa International Chess Tournament 2025: गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘अ’ गटात सोमवारी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना पराभवाचा धक्का दिला.

Manish Jadhav

पणजी: गोव्याचे इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझ आणि अमेय अवदी यांनी धडाकेबाज खेळ करताना ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘अ’ गटात सोमवारी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना पराभवाचा धक्का दिला, तर ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

शानदार स्पर्धा

दरम्यान, स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु आहे. स्पर्धेच्या चौथ्या फेरीअंती तामिळनाडूचा ग्रँडमास्टर एस. पी. सेतूरमण, रशियाचा आयएम अलेक्झांडर स्लिझेवस्की, तामिळनाडूचा (Tamil Nadu) आयएम एस. नितीन व किर्गिझस्तानचा आयएम सेमेतेई तोलोगन तेगिन यांनी चारही डाव जिंकून प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त अव्वल स्थान मिळवले आहे. अव्वल मानांकित ग्रँडमास्टर दीप्तयन घोष याला चौथ्या फेरीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे साडेतीन गुणांसह तो दुसऱ्या क्रमांकावर गेला.

स्पर्धेत अपराजित असलेल्या 13 वर्षीय एथनने (एलो 2412) तुलनेत अधिक अनुभवी ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण (एलो 2023) याला पराभूत केले. राष्ट्रकुल बुद्धिबळातील 16 वर्षांखालील सुवर्णपदक विजेत्या एथनचे हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. अन्य एका बरोबरीसह त्याचे साडेतीन गुण असून तो संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. अमेय (एलो 2422) याने अमेरिकन ग्रँडमास्टर रसेट झियात्दिमोव (एलो 2031) याची विजयी कूच रोखले. शानदार विजयामुळे अमेयचे आता अडीच गुण झाले आहेत.

ग्रँडमास्टर अनुराग (एलो 2499) याने लौकिकास साजेसा खेळ करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून एकूण गुणसंख्या तीन गुणांवर नेली. चौथ्या फेरीत त्याने महाराष्ट्राची वूमन इंटरनॅशनल मास्टर (डब्ल्यूआयएम) मृदुल देहनकर (एलो 2121) हिला नमविले. आयएम ऋत्विज परब (एलो 2371) याने बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खिंड लढविली, पण अखेरीस पश्चिम बंगालमधील पाचवा मानांकित ग्रँडमास्टर मित्रभा गुहा (एलो 2509) गोव्याच्या (Goa) खेळाडूस भारी ठरला. पराभवामुळे ऋत्विजचे अडीच गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT