Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

Goa FIDE rating competition: व्हेटरन गटात हरीश फुलवानी व आर. एन. हरीरामाणी, महिला गटात आर्या दाभोळकर व अलाना आंद्राद यांना सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळाले
Goa FIDE rating competition: व्हेटरन गटात हरीश फुलवानी व आर. एन. हरीरामाणी, महिला गटात आर्या दाभोळकर व अलाना आंद्राद यांना सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळाले
Bandodkar Open Rating Chess Tournament 2024Dainik Gomantal
Published on
Updated on

Goa Sports News

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) नीतिश बेलुरकर याने ‘श्रीमती सुनंदाबाई दयानंद बांदोडकर स्मृती’ ब्लिट्झ फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अकरा फेऱ्यांच्या स्पर्धेत अपराजित राहताना त्याने सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई केली. स्पर्धा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात शुक्रवारी झाली.

गोव्याचा मंदार लाड, इंद्रजीत महिंद्रकर, किरण पंडितराव, हरीश शर्मा यांचे समान नऊ गुण झाले. टायब्रेकर गुणांत मंदार उपविजेता ठरला. इंद्रजीतला तिसरा, किरणला चौथा, तर हरीशला पाचवा क्रमांक मिळाला. श्रीराज भोसले, अभिषक केळकर, एड्रिक वाझ, नितीन बाबू, सप्तर्षी रॉय चौधरी, दत्ता कांबळी, सुधीरकुमार सिन्हा, एम. फरहान, शेजल संजय, रुपम मुखर्जी, विश्वेश कोचरेकर, विहान तारी, आय. किरपेश, जे. पी. करण, पंकज भट, दिमित्री बेझस्त्राखोव, ऋषिकेश कबनुरकर, गुंजल चोपडेकर, रवींद्र निकल यांना सहावा ते पंचविसावा क्रमांक मिळाला.

Goa FIDE rating competition: व्हेटरन गटात हरीश फुलवानी व आर. एन. हरीरामाणी, महिला गटात आर्या दाभोळकर व अलाना आंद्राद यांना सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळाले
Goa Chess Tournament: मानांकन स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंची विजयी सलामी; रशिया-इंग्लंडमधून खेळाडूंचा सहभाग

व्हेटरन गटात हरीश फुलवानी व आर. एन. हरीरामाणी, महिला गटात आर्या दाभोळकर व अलाना आंद्राद यांना सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळाले. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे सदस्य सचिव अशोक परब, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, खजिनदार विश्वास पिळर्णकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव दत्ताराम पिंगे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Durand Cup Football Tournament 2026
Goa Under 19 Cricket Team
 Ethan Vaz Grandmaster
SAFF Women's Championship 2026 Final
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com