Mervyn fernandes, Joaquim carvalho Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Hockey: 'गोव्यातून जास्तीत जास्त ऑलिंपियन घडवायचे आहेत'! माजी हॉकीपटूंचा निर्धार; आग्नेल संकुलाच्या उपक्रमास पाठिंबा

Hockey training programs in Goa schools: मूळ गोमंतकीय माजी ऑलिंपियन हॉकीपटू मर्विन फर्नांडिस व ज्योकिम कार्व्हालो यांनी राज्यातील हॉकी विकासासाठी पुढाकार घेतला.

Sameer Panditrao

पणजी: मूळ गोमंतकीय माजी ऑलिंपियन हॉकीपटू मर्विन फर्नांडिस व ज्योकिम कार्व्हालो यांनी राज्यातील हॉकी विकासासाठी पुढाकार घेतला. दीर्घकालीन उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यांनी वेर्णा येथील आग्नेल तांत्रिक शिक्षण संकुलातील महत्त्वाकांक्षी शालेय हॉकी कार्यक्रमास पाठिंबा दर्शविला.

वेर्णा येथील फादर आग्नेल आश्रम मैदानावर शालेय हॉकी उपक्रमास सुरवात झाली. यावेळी मर्विन व ज्योकिम यांची उपस्थिती होती. फादर आग्नेल मल्टिपर्रज हायस्कूलच्या हॉकी कार्यक्रमात प्राथमिक स्तरापासून खेळातील विकास साधण्यावर भर दिला जाईल.

यावेळी दोन्ही माजी ऑलिंपियन हॉकीपटूंनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपक्रमाचे उद्‍घाटन झाल्यानंतर १४ वर्षांखालील मुली व मुलांच्या संघात प्रदर्शनीय हॉकी सामना झाला. सहभागी संघांना हॉकी किट वितरित करण्यात आले.

‘‘आमचे ध्येय स्पष्ट आहे, ज्याद्वारे गोव्यातून जास्तीत जास्त ऑलिंपियन घडवायचे आहेत. माझ्या माहितीनुसार, आम्ही दोघे बहुधा गोव्यातील शेवटचे (हॉकी) ऑलिंपियन आहोत,’’ असे मर्विन म्हणाले. या उपक्रमाचे फायदे लगेच दिसणार नाही ही बाब मर्विन यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘‘या कार्यक्रमाच्या फलितासाठी काही काळ जाऊ शकतो, परंतु भविष्यात याचा नक्कीच सकारात्मक परिणाम जाणवेल आणि गोव्यातून नवीन खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील.’’ या कार्यक्रमाची संकल्पना दोन महिन्यांपूर्वी आग्नेल तांत्रिक शिक्षण संकुलाचे संचालक फादर आग्नेल गोम्स यांच्याशी चर्चा करताना सुचली, अशी माहितीही मर्विन यांनी दिली. ६५ वर्षीय ज्योकिम, तसेच मर्विन यांनी भारतीय हॉकीसाठी १९८०च्या काळात मोठे योगदान दिले.

‘‘लहान वयातच विद्यार्थ्यांना हॉकी खेळातील तंत्रशुद्ध बारकावे शिकवणे आणि खेळ गोव्यात अधिकाधिक लोकप्रिय करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.’’
फादर आग्नेल गोम्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT