Goa Cricket Stadium  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket Stadium: गोव्यात क्रिकेट सामने कधी होणार? 15 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या यजमानपदास वंचित

Goa Sports News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे पेडण्यातील धारगळ येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधण्याबाबत संदिग्धता आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे पेडण्यातील धारगळ येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधण्याबाबत संदिग्धता आहे. डिचोलीतील म्हावळिंगे येथील स्वतःच्या जागेत स्टेडियम उभारण्याबाबत संघटनेचे अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनुभवण्याची भूक कायम राहील.

गोव्यातील क्रिकेटप्रेमी १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट `याची देही याची डोळा` पाहण्यापासून वंचित आहेत. विविध आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक आखताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय निकषप्राप्त स्टेडियम नसल्यामुळे गोव्याकडे सातत्याने काणाडोळा करते ही बाब स्पष्ट आहे. भविष्यात या पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध राज्यात लवकर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेट सामना होण्याची शक्यता अंधूक आहे.

गोव्याला अखेरच्या वेळेस बीसीसीआयने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे यजमानपद बहाल केले होते, पण २४ ऑक्टोबर २०१० रोजी पावसाचाच खेळ झाला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे मैदान खेळण्यास अयोग्य ठरले.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारत व मायकल क्लार्क कर्णधार असलेल्या ऑस्ट्रेलिया या संघांतील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला होता. त्यामुळे स्टेडियमवर मोठ्या संख्येने आलेल्या क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशाच पडली होती. मालिकेचा बक्षीस वितरण सोहळा नंतर हॉटेलमध्येच झाला होता.

गोव्यातील नऊपैकी सहा लढती निकाली

२५ ऑक्टोबर १९८९ ते २४ ऑक्टोबर २०१० या कालावधीत गोव्याला एकूण ९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे यजमानपद मिळाले. सर्व सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाले. त्यापैकी सहा सामने निकाली ठरले. एक लढत पावसामुळे अपूर्ण राहिली, तर दोन वेळा वरुणराजा कोपल्यामुळे एकही चेंडू न टाकता लढत रद्द करावी लागली. ६ एप्रिल २००१ रोजीचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कथित तिकीट विक्री घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरला, मोठी बदनामी झाली, तरीही पुढील नऊ वर्षांत आणखी तीन सामने खेळविण्याची जबाबदारी गोवा क्रिकेट संघटनेला मिळाली.

गोव्यात झालेले आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेट सामने

२५-१०-१९८९ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - ऑस्ट्रेलिया विजयी २८ धावांनी

८-१२-१९९० - भारत विरुद्ध श्रीलंका - श्रीलंका ७ विकेटने विजयी

२६-१०-१९९४ - वेस्ट इंडीज विरुद्ध न्यूझीलंड - सामना अपूर्ण

२१-११-१९९५ - भारत विरुद्ध न्यूझीलंड - एकही चेंडू न टाकता रद्द

२८-१२-१९९७ - भारत विरुद्ध श्रीलंका - श्रीलंका ५ विकेटने विजयी

६-४-२००१ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - भारत ४ विकेटने विजयी

३-४-२००६ - भारत विरुद्ध इंग्लंड - भारत ४९ धावांनी विजयी

१४-२-२००७ - भारत विरुद्ध श्रीलंका - भारत ५ विकेटने विजयी

२४-१०-२०१० - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - एकही चेंडू न टाकता रद्द

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: मंत्री रवी नाईक यांना कोडारवासियांचे IIT विरोधात निवेदन

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT