
बातमीबाबत थोडक्यात माहिती
१) गोव्यात म्हावळिंगे- डिचोली येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्याचे नियोजित आहे.
२) गेल्या सात वर्षापासून गोवा क्रिकेट असोसिएशनने याबाबत अद्याप कोणतेही काम सुरु केलेले नाही
३) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला त्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरले
पर्वरी: म्हावळिंगे- डिचोली येथे होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनची अनास्था प्रश्नोत्तराच्या तासांत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान स्पष्ट दिसून आली. जीसीएने अद्याप आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत, तसेच जोड रस्ता किंवा हायटेन्शन वायर हटविण्यासाठी अर्ज केला नसल्याचे उत्तर प्रवीण आर्लेकरांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.
प्रश्नोत्तराच्या तासांत सुरुवातीलाच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा प्रश्न उपस्थित केला. मतदरासंघात एकूण ९ लाख चौ. मी. जागा सरकारने घेतली होती. त्यात आयुष रुग्णालय, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले, पण क्रिकेटच्या मैदानासाठी जवळपास दोन लाख चौ. मी जागा जीसीए देण्यात आली होती. पण, सात वर्षापासून भूमीपूजन झाले नाही, असा प्रश्न आर्लेकरांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारने १ लाख ८९ हजार चौ. मी जागा जीसीएला मैदानासाठी दिली होती. जीसीएने मैदानासाठी अद्याप आवश्यक कोणत्याही परवनाग्या घेतलेल्या नाहीत. प्राईम लोकेशन असताना जीसीएने अद्याप कोणतीही हालचाल केली नाही, याबाबत २०२४ मध्ये त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय, त्यांच्याकडून उत्तर देखील प्राप्त झाले आहे. प्रक्रियेनुसार, पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जीसीए आणि सरकार यांच्यातील करार दहा वर्षांचा आहे. यातील सात वर्षे गेली असून, अद्याप काहीच प्रगती झालेली नाही. सरकार जीसीएकडून जागा मागे घेणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री सरकारने त्यांना एक कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याला त्यांनी गंभीर्याने उत्तर दिले नाही, सरकार आणखी एक नोटीस बजावून त्याबाबत जीसीए गांभीर नसल्यास सरकार जमीन परत घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकरांचा दाखला देत पर्रीकरांनी ही जागा केवळ आणि केवळ लोकेशन विचारात घेऊन निश्चित केली होती. जीत आरोलकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्ना प्रमाणे जीसीएला जोडणी रोड आणि हायटेन्शन वायर हटविण्यासाठी मागणी केली होती का? आणि केला असेल तर सरकारने काय केलं? असा प्रश्न सरदेसाईंनी केला. जीसीएने जोडणी रस्त्यासाठी अर्ज केला नाही तर वायरबाबत अर्जाची वीज खात्याकडे चौकशी करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी प्रवीण आर्लेकरांनी पेडण्यात १ लाख चौ. मी जागा क्रिडासाठी द्यावी अशी मागणी केली. पेडण्यात जागा देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. अशी कोणती जागा असल्यास त्यांनी निश्चित करुन सरकारच्या निदर्शनास आणवी, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात १५३ मैदान तयार करण्यात आले आहेत, १० ते १२ सुरु असून बाकीचे वापरात नसल्याची चिंता देखील सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.
सतत विचारले जाणार प्रश्न/ FAQ
प्रश्न: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन किती दिवस आहे?
उत्तर: २१ जुलै रोजी सुरु झालेले अधिवेशन ०८ ऑगस्ट पर्यंत (१५ दिवस) सुरु राहणार आहे.
प्रश्न: गोव्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आहेत. त्यांच्याकडेच गृह आणि अर्थ खात्याची जबाबदारी आहे.
प्रश्न: गोव्याची विधानसभा कुठे आहे?
उत्तर: गोव्याची विधानसभा राजधानी पणजी जवळील
प्रश्न: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान कुठे उभारले जाणार आहे?
उत्तर: गोव्यात म्हावळिंगे- डिचोली येथे क्रिकेट मैदान उभारण्याचा प्रस्ताव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.