GCA: प्रशांत जोशी ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित! गोमंतकीय क्रिकेटसाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी कौतुक

Prashant Joshi Cricket Award: गोव्यातील क्रिकेटच्या प्रगती आणि विकासासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीत एकी असणे आवश्यक आहे, त्यावर भर द्यावा असा सूर समारंभात बहुतेक क्लब प्रतिनिधींनी व्यक्त केला.
Prashant Joshi Lifetime Achievement Award
Prashant Joshi Lifetime Achievement AwardDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी उपाध्यक्ष, गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत जोशी यांना ‘जीसीए’ने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. माशेल येथे झालेल्या शानदार ‘यशोगाथा’ बक्षीस वितरण सोहळ्यात जोशी यांनी गोमंतकीय क्रिकेटसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव झाला.

सोहळ्यात २०२३-२४ व २०२४-२५ मधील जीसीए प्रीमियर लीग, तसेच अ, ब , क विभागीय विजेते, २०२४-२५ मधील रणजी प्लेट विभाग संघ, तसेच इतर वैयक्तिक बक्षीस विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी जीसीए अध्यक्ष विपुल फडके, सचिव शंभा नाईक देसाई, खजिनदार दया पागी, संयुक्त सचिव रुपेश नाईक, सदस्य राजेश पाटणेकर यांची उपस्थिती होती.

क्रिकेटच्या विकासासाठी ‘एकी’वर भर

गोव्यातील क्रिकेटच्या प्रगती आणि विकासासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीत एकी असणे आवश्यक आहे, त्यावर भर द्यावा असा सूर समारंभात बहुतेक क्लब प्रतिनिधींनी व्यक्त केला. जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनीही आपल्या भाषणात राज्य क्रिकेटच्या घोडदौडीसाठी एकमत असणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

यावरून भविष्यात एकजूट असलेली व्यवस्थापकीय समिती गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये सक्रिय होण्याचे संकेत आहेत. २०२२ मध्ये झालेल्या जीसीए निवडणुकीत रिंगणात माजी अध्यक्ष चेतन देसाई गट व विनोद फडके गट प्रतिस्पर्धी होते, आता आगामी निवडणुकीत मतैक्य होण्याबाबत राज्यातील बहुतांश क्लबनी पुढाकार घेतल्याचे बक्षीस वितरण सोहळ्यात दिसून आले.

Prashant Joshi Lifetime Achievement Award
GCA Premiere League: पणजी जिमखान्यासमोर 219 धावांचे आव्हान, हेरंब परबची भेदक गोलंदाजी

नावीन्यपूर्ण उपक्रम

जीसीएने राज्यातील क्रिकेटच्या प्रगतीसाठी विविध ठिकाणी मिळून ११ खेळपट्ट्या तयार केल्या असून असून अद्ययावत व्यायामशाळा निर्मितीकडे पाऊले टाकली आहेत. खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देताना वैद्यकीय पुनर्वसन केंद्रास प्राधान्य देण्यात आल्याचे जीसीए सचिव शंभा नाईक देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Prashant Joshi Lifetime Achievement Award
GCA Premiere League: पणजी जिमखान्यासमोर 219 धावांचे आव्हान, हेरंब परबची भेदक गोलंदाजी

जीसीएकडून संलग्न क्लबना तीन लाख रुपये अनुदान दिले गेले असून काही क्लबची मागील अनुदान प्रलंबित आहे, संबंधित सर्व व्यवहार संबंधित क्लबनी पूर्ण करून रक्कम घ्यावी असा सल्लाही नाईक देसाई यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com