Wicketkeeper recruitment India cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji: गोव्याच्या रणजी संघाला हवाय हुकमी खेळाडू! यष्टिरक्षक-फलंदाजाचा शोध सुरु; एलिट गटासाठी जोरदार तयारी

Goa Cricket: गतमोसमातील प्लेट विभागात सिद्धार्थने फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले, पण तो अपयशीच ठरला. जीसीएने त्याचा करार वाढवलेला नाही.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याने आगामी २०२५-२६ मधील देशांतर्गत मोसमातील रणजी क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटासाठी पात्रता मिळविलेली आहे. पुन्हा पदावनती टाळण्यासाठी मातब्बर संघांविरुद्धचे सर्वच सामने महत्त्वाचे असतील, त्या दृष्टीने फलंदाजी बळकट करण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) हुकमी यष्टिरक्षकाचा शोध सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.

गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाने २०२४-२५ मधील प्लेट विभागात हुकमत राखताना अंतिम लढतीसह सर्व सहाही सामने जिंकले, मात्र यष्टिरक्षक समर दुभाषी याचे योगदान लक्षवेधी ठरले नाही. फलंदाजीत त्याला खूपच खालच्या क्रमांकावर संधी मिळाली. एकंदरीत त्याने सहा सामन्यांत एका अर्धशतकासह १८१ धावा केल्या.

त्यापूर्वी, २०२४-२५ मोसमातील रणजी एलिट स्पर्धेत समरने दोन सामन्यांत यष्टिरक्षण केले होते, तर पाच सामन्यांत कर्नाटकचा ‘पाहुणा’ के. व्ही. सिद्धार्थ याच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. गतमोसमातील प्लेट विभागात सिद्धार्थने फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले, पण तो अपयशीच ठरला. जीसीएने त्याचा करार वाढवलेला नाही. या पार्श्वभूमीवर वरच्या फळीत भक्कम फलंदाजी करणाऱ्या यष्टिरक्षकाची जीसीएला आवश्यकता भासत असल्याचे सूत्राने नमूद केले.

प्राप्त माहितीनुसार, जीसीएने आगामी रणजी क्रिकेट मोसमासाठी नव्या यष्टिरक्षकास प्राधान्य दिल्यास तो पाहुणा खेळाडू असेल. संघटनेने काही नावांवर चर्चाही सुरू केली आहे, पण अजून ठोस निर्णय झालेला नाही.

पाहुण्या यष्टिरक्षकांची छाप

गोव्याचा रणजी क्रिकेट संघ २०१९-२० मोसमात प्लेट गटात खेळला. त्यावेळी पाहुणा सी. एम. गौतम याच्यावर कर्नाटकमधील स्पर्धेतील मॅच फिक्सिंग आरोपामुळे बंदी आल्यानंतर ऐनवेळी नवा यष्टिरक्षक शोधावा लागला. बडोदा-गुजरातकडून खेळलेल्या स्मित पटेल याची गोव्याच्या संघात वर्णी लागली. २०१२ मधील १९ वर्षांखालील जगज्जेत्या भारतीय संघातील या यष्टिरक्षकाने गोव्यातर्फे १० सामन्यांत ३ शतकांसह ७९९ धावा करताना २० झेल व २ यष्टिचीतची नोंद केली.

मुंबईचा एकनाथ केरकर गोव्याकडून दोन मोसम (२०२१-२२ व २०२२-२३) खेळला. त्याने एकूण १० सामन्यांत १ शतक व ५ अर्धशतकांसह ५९३ धावा करताना २७ झेल व २ यष्टिचीत अशी कामगिरी केली. मात्र नंतर जीसीएने त्याचा करार संपुष्टात आणला आणि एकनाथ २०२३-२४ पासून छत्तीसगडकडून खेळू लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT