Ranji Trophy Semifinal: सेमिफायनलचा थरार! 'हे' चार संघ भिडणार; जाणून घ्या स्क्वाड, वेळ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचे अपडेट्स

Ranji Trophy 2024-25 Semifinal: रणजी करंडकाची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिथे उपांत्य फेरीसाठी चारही संघ निश्चित झाले आहेत.
Ranji Trophy Semifinal
Ranji Trophy 2024-25 Dainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Trophy 2024-25 Semifinal: रणजी करंडकाची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिथे उपांत्य फेरीसाठी चारही संघ निश्चित झाले आहेत. गुजरात, केरळ, विदर्भ आणि मुंबई या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान हे चार संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उपांत्य फेरीचे सामने खेळतील. मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणे, विदर्भाचे नेतृत्व अक्षय वाडकर, गुजरातचे नेतृत्व चिंतन गजा तर केरळचे सचिन बेबी करणार आहे.

दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार!

पहिला उपांत्य सामना गुजरात (Gujrat) आणि केरळ यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना नागपूर स्टेडियमवर विदर्भ आणि मुंबई संघांमध्ये खेळला जाईल. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 17 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होतील.

Ranji Trophy Semifinal
Vijay Hazare Trophy Semifinal: सेमीफायनलसाठी 4 संघ निश्चित! कोण-कोणाशी अन् कधी भिडणार? जाणून घ्या सर्वकाही

जिओ हॉटस्टार अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग

भारतीय क्रिकेट चाहते रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे सामने स्पोर्ट 18 वर थेट पाहू शकतात. याशिवाय, जिओ हॉटस्टार अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. यासाठी चाहत्यांना फक्त त्यांच्या फोनवर जिओ हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर ते सामन्यांचा आनंद घेऊ शकतील.

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चार संघांचे संघ:

मुंबई संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष. तन्ना.

Ranji Trophy Semifinal
Ranji Trophy 2025: विराट रणजीतही 'फेल'; 15 चेंडूत खेळ खल्लास, बॉलरचा कोहलीसारखाच जल्लोष

विदर्भ संघ: अक्षय वाडकर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, नचिकेत भुते, सिद्धेश वाथ (यष्टिरक्षक), यश ठाकूर, दानिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शौरी.

गुजरात संघ: प्रियांक पांचाळ, आर्या देसाई, सिद्धार्थ देसाई, मनन हिंगराजिया, जयमीत पटेल, उर्विल पटेल (यष्टीरक्षक), चिंतन गजा (कर्णधार), विशाल जयस्वाल, रवी बिश्नोई, अर्जन नागवासवाला, प्रियजितसिंग जडेजा, ऋषी पटेल, आदित्य उदयकुमार पटेल, रिंकेश वाघेला, उमंग कुमार, तेजस पटेल, हेमांग पटेल, हेत पटेल, क्षितिज पटेल.

Ranji Trophy Semifinal
Ranji Trophy: गोमंतकीय खेळाडूंनी साधली 'किमया'! अर्जुन तेंडुलकरसह गोव्याच्या पाहुण्या खेळाडूंकडून रणजी स्पर्धेत घोर निराशा

केरळ संघ: अक्षय चंद्रन, रोहन कुन्नुम्मल, शॉन रॉजर, सचिन बेबी (कर्णधार), जलज सक्सेना, सलमान निजार, मोहम्मद अझरुद्दीन (यष्टीरक्षक), आदित्य सरवते, एमडी निधीश, नेदुमकुझी बेसिल, बेसिल थंपी, वैशाख चंद्रन, बाबा अपराजित, विष्णू विनोद, केएम आसिफ, फजिल फानूस, वत्सल गोविंद, कृष्णा प्रसाद, आनंद कृष्णन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com