GCA Premier League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

GCA Premier League Final 2026: कर्णधार स्नेहल कवठणकर (२४१) याचे द्विशतक, तसेच वीस वर्षीय जीवन चित्तेम (१०१) याचे शतक या बळावर धेंपो क्रिकेट क्लबने पहिला डाव ९ बाद ६४६ या अजस्त्र धावसंख्येवर घोषित केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कर्णधार स्नेहल कवठणकर (२४१) याचे द्विशतक, तसेच वीस वर्षीय जीवन चित्तेम (१०१) याचे शतक या बळावर धेंपो क्रिकेट क्लबने पहिला डाव ९ बाद ६४६ या अजस्त्र धावसंख्येवर घोषित केला आणि गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग अंतिम लढतीतील अर्धी मोहीम फत्ते केली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी अभिनव तेजराणा (२-२९) व मोहित यादव (१-३५) यांनी चौगुले स्पोर्टस क्लबची ३ बाद १२८ अशी स्थिती केल्यामुळे गतविजेता संघ संकटात सापडला आहे. ते अजून ५१८ धावांनी मागे आहेत. सलामीचा गौरेश कांबळी खिंड लढवत असून ७१ धावांच्या नाबाद खेळीत त्याने ८७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार मारले. पिंक बॉल डे-नाईट चार दिवसीय अंतिम सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू आहे.

स्नेहल कवठणकर याने लौकिकाला साजेशी फलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो १३६ धावांवर नाबाद होता. गुरुवारी त्याने शैलीदार फलंदाजी कायम राखली, मात्र डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळच्या चेंडूवर पुढे सरसावत खेळणे स्नेहलला महागात पडले. यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळने बाकी काम चोख बजावल्यामुळे धेंपो क्लबच्या कर्णधारास अडीचशे धावांची खेळी हुकली.

त्याने युवा फलंदाज जीवन याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी २६८ धावांची दमदार भागीदारी केली. स्नेहल बाद झाल्यानंतर लगेच दोन धावांच्या अंतराने शतकवीर जीवन बाद झाला. त्याला शुभम देसाईने पायचीत केले. जीवनने २३३ चेंडूंचा सामना करताना १३ चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या.

स्नेहलकडून धावांचा रतीब

यावेळच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत स्नेहल कवठणकरने याने धावांचा रतीब टाकला आहे. त्याने सहा सामन्यांतील नऊ डावांत ७२.७७च्या सरासरीने ६५५ धावा केल्या असून यामध्ये दोन शतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव (५ बाद ४१२ वरून) ः १५०.२ षटकांत ९ बाद ६४६ घोषित (स्नेहल कवठणकर २४१, जीवन चित्तेम १०१, मोहित यादव २८, कुतबुदिन जमादार नाबाद २०, शुभम तारी २-४४, शुभम देसाई ३-१४६) विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः २७ षटकांत ३ बाद १२८ (गौरेश कांबळी नाबाद ७१, अभिनव तेजराणा २-२९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

VIDEO: अर्शदीपचा वार अन् 'सूर्या'ची हार! सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगनं चाहत्यांचं फिरलं डोकं; सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

SCROLL FOR NEXT