Goa medal tally at National Games  Canva
गोंयचें खेळामळ

National Games: 120 खेळाडूंचा सहभाग, 15 जणांना पदके; पेंटॅथलॉनमध्ये सर्वाधिक यश, 'बाकीच्यांचे' काय?

Goa national games performance: उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने १८ खेळांसाठी राज्याच्या १२० क्रीडापटूंना हिरवा कंदिल दाखविला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa medal tally at National Games

पणजी: उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने १८ खेळांसाठी राज्याच्या १२० क्रीडापटूंना हिरवा कंदिल दाखविला, त्यात अधिकृत चार व एका प्रदर्शनीय खेळांत मिळून एकूण १५ क्रीडापटूच पदके जिंकू शकले. पदकतक्त्यात गोव्याने दोन सुवर्ण, चार रौप्य व चार ब्राँझसह दहा पदके जिंकून २७वा क्रमांक मिळविला.

‘‘गोव्यासाठी अधिकृत पदकतक्यातील चार खेळ आणि प्रदर्शनीय खेळातील पदके वगळता इतरांची कामगिरी निराशाजनक ठरली. थोडक्यात बहुतांश खेळाडूंसाठी उत्तराखंडमधील स्पर्धा पिकनिकच ठरली,’’ अशी टीकात्मक प्रतिक्रिया गोवा ऑलिंपिक संघटनेशी संबंधित एका क्रीडा अधिकाऱ्याने व्यक्त केली.

स्पर्धेत गोव्याला दोन सुवर्णपदके मिळाली. महिला स्क्वॉशमध्ये आकांक्षा साळुंखे हिने, तर पुरुष योगासनात शुभम देबनाथ याने सुवर्णपदक जिंकले. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये चार रौप्य व तीन ब्राँझसह एकूण सात पदके मिळाली. या खेळात बाबू गावकर याने वैयक्तिक व सांघिक मिळून चार रौप्यपदके जिंकली. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सहभागी गोव्याच्या सर्व १० ॲथलीटना पदके मिळाली.

योगासनात गोव्याचा एकच खेळडू होता. बीच व्हॉलिबॉलमध्ये रामा धावसकर व नितीन सावंत जोडीने ब्राँझपदकाची कमाई केली. कलारीपयट्टू या खेळात भुवनेश्वरी जाधव हिने सुवर्णपदक जिंकले, परंतु प्रदर्शनीय खेळ असल्याचे तिचे पदक अधिकृत पदकतक्यात नोंदीत झाले नाही.

पुरुष फुटबॉल, तायक्वांदो, नेमबाजी, हँडबॉल (पुरुष व महिला), ॲथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, तिरंदाजी, सायकलिंग, ट्रायथलॉन, बॉक्सिंग, वुशू, वेटलिफ्टिंग या खेळात गोव्याला एकही पदक मिळाले नाही. फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ, पण पदक जिंकणे कठीण ठरले. पुरुष संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. हे अपयश खटकणारे ठरले.

श्रुंगी जलतरणात कमनशिबी

गुजरात व गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरण पदके जिंकलेली गोव्याची अनुभवी जलतरणपटू श्रुंगी बांदेकर उत्तराखंडमध्ये कमनशिबी ठरली. महिलांच्या ४०० मीटर व २०० मीटर मेडली चौथा क्रमांक मिळाल्याने श्रुंगीला ब्राँझपदक थोडक्यात हुकले. २०० मीटर मेडलीत तिला ०.४२ सेकंद वेळेच्या फरकाने तिसरा क्रमांक चुकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT