
पणजी: मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याने एकूण सात पदके जिंकली. त्यामुळे उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला दोन सुवर्णांसह एकूण दहा पदकांसह राज्याला २७ वा क्रमांक मिळाला.
गोव्याने मॉडर्न पेंटॅथलॉनमधील लेझर रन, ट्रायथल व टेट्रॅथलॉन प्रकारात पदके जिंकली. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकारात मिळून गोव्याचे दहा ॲथलीट सहभागी झाले व त्या सर्वांनी पदकाची कमाई केली. बाबू गावकर याचे यश स्पृहणीय ठरले. वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारा तो एकमेव ठरला. त्याला लेझर रन वैयक्तिकसह एकूण चार रौप्यपदके मिळाली.
याशिवाय सांघिक प्रकारात सूरज नोमी वेळीप व हरिचंद्र वेळीप यांनी प्रत्येकी दोन रौप्य, सूरज दत्ता वेळीप याने दोन ब्राँझ, नेहा गावकर हिने प्रत्येकी एक रौप्य व ब्राँझ, तसेच प्रतीक्षा वेळीप, अंकिता वेळीप, वैष्णवी वड्डार, उदेश माजिक, सुनील गावकर यांना प्रत्येकी एक ब्राँझपदक प्राप्त झाले.स्क्वॉशमध्ये महिलांत आकांक्षा साळुंखे, पुरुष योगासनात शुभम देबनाथ यांना सुवर्णपदक मिळाले, तर बीच व्हॉलिबॉल स्पर्धेत रामा (पप्पू) धावसकर व नितीन सावंत जोडीला ब्राँझपदक प्राप्त झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.