Goa Cricket News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Premiere League: पणजी जिमखान्यासमोर 219 धावांचे आव्हान, हेरंब परबची भेदक गोलंदाजी

Goa Premiere League: गोवा क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी पणजी जिमखान्यासमोर २१९ धावांचे लक्ष्य आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी पणजी जिमखान्यासमोर २१९ धावांचे लक्ष्य आहे. मंगळवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. चौगुले स्पोर्ट्‌स क्लबने पहिल्या डावात ३८ धावांची आघाडी प्राप्त केली.

पर्वरी येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या दिवस-रात्र, गुलाबी चेंडूच्या अंतिम लढतीत दुसऱ्या दिवशी पणजी जिमखान्याचा वेगवान गोलंदाज हेरंब परब याने भन्नाट मारा केला. त्याने १० षटकांत २५ धावांत ५ गडी बाद केले. त्यामुळे २ बाद १३७ वरून चौगुले क्लबचा डाव ९ बाद १५४ असा गडगला आणि नंतर १८० धावांत संपुष्टात आला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २ बाद ७४ वरून पणजी जिमखान्याचा पहिला डाव समर्थ राणे (४-३२) व दर्शन मिसाळ (४-३७) या वेगवान-फिरकी जोडीने १२८ धावांत गुंडाळला. मंगळवारी खेळ थांबला तेव्हा पणजी जिमखान्याने दुसऱ्या डावात १ बाद १ धाव केली होती.

पणजी जिमखान्याचा डाव गुंडाळल्यानंतर चौगुले क्लबच्या डावाची सुरुवात आश्वासक होती. सलग दुसऱ्या डावात अर्धशतक केलेल्या डावखुऱ्या आर्यन नार्वेकर (५०) याने रिजुल पाठक (२५) याच्यासमवेत संघाला ८३ धावांची सलामी दिली. नंतर क्षितीज पटेल व मनन हिंग्राजिया यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. हेरंबने स्वतःच्याच गोलंदाजीवर क्षितिजला झेल पकडल्यानंतर चौगुले क्लबचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

संक्षिप्त धावफलक

चौगुले स्पोर्ट्‌स क्लब, पहिला डाव : १६६. पणजी जिमखाना, पहिला डाव (२ बाद ७४ वरून) : ५० षटकांत सर्वबाद १२८ (योगेश कवठणकर ४२, समर्थ राणे ४-३२, दर्शन मिसाळ ४-३७). चौगुले स्पोर्ट्‌स क्लब, दुसरा डाव : ५७.५ षटकांत सर्वबाद १८० (आर्यन नार्वेकर ५०, रिजुल पाठक २५, हेरंब परब ५-२५, तनय त्यागराजन २-६४). पणजी जिमखाना, दुसरा डाव : १.३ षटकांत १ बाद १.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT