
पणजी: हैदराबादतर्फे रणजी क्रिकेट खेळणारा डावखुरा फिरकी गोलंदाज तनय त्यागराजन (७-५१) याच्या प्रभावी माऱ्यासमोर चौगुले स्पोर्ट्स क्लबने पहिल्या डावात नमते घेतले. त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत पणजी जिमखान्याने पहिल्या दिवशी वरचष्मा राखला.
झुंझार अर्धशतक नोंदविलेल्या आर्यन नार्वेकर (१७० चेंडूंत ७४ धावा, ६ चौकार, २ षटकार) याने पणजी जिमखान्याच्या फिरकी माऱ्याचा धैर्याने सामना केला; पण इतर फलंदाजांना संयम बाळगता आला नाही. नवव्या विकेटच्या रूपात बाद झालेल्या आर्यनला पुलकित नारंगने पायचीत बाद केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चौगुले क्लबची एकवेळ २ बाद १०० अशी सुस्थिती होती; पण तनयच्या फिरकी जाळ्यात फलंदाज अलगद अडकल्याने आठ विकेट ६६ धावांत गमावल्यामुळे चौगुले क्लबचा डाव १६६ धावांत संपुष्टात आला. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर पणजी जिमखान्याने मंथन खुटकर याच्या ४६ धावांच्या बळावर २ बाद ७४ धावा केल्या. ते अजून ९२ धावांनी मागे आहेत.
पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सोमवारपासून गोवा क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील पहिला दिन-रात्र मल्टि-डे (तीन दिवसीय) क्रिकेट सामना गुलावी चेंडूने खेळला गेला. जीसीए अध्यक्ष विपुल फडके, संयुक्त सचिव रुपेश नाईक, क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाच्या खेळास सुरवात झाली.
संक्षिप्त धावफलक ः चौगुले स्पोर्ट्स क्लब, पहिला डाव : ५८.१ षटकांत सर्वबाद १६६ (आर्यन नार्वेकर ७४, क्षितीज पटेल २०, मनन हिंग्राजिया २५, पुलकित नारंग २-५७, तनय त्यागराजन ७-५१) विरुद्ध पणजी जिमखाना, पहिला डाव : ३१ षटकांत २ बाद ७४ (मंथन खुटकर ४६, योगेश कवठणकर नाबाद १७).
एफसी गोवाचा ३२ वर्षीय मध्यरक्षक आयर्लंडचा कार्ल मॅकह्यू याने सांगितले, की ‘संघाची मानसिकता सकारात्मक आहे. शिल्ड हुकल्यानंतर आम्हाला करंडक जिंकायचा आहे. साखळी फेरीनंतर मोठी विश्रांती मिळाली. त्यामुळे परिस्थिती वेगळी आहे. तयारीसाठीही वेळ मिळाला. आता सर्व लक्ष प्ले-ऑफ सामन्यावर केंद्रित असून आम्हाला कारणे द्यायची नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील सामना आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत आणि ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.