Rahul Keni Goa X
गोंयचें खेळामळ

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Rahul Keni Goa Umpire: राहुल यांनी अखिल भारतीय क्रिकेट सामनाधिकारी पंच परीक्षेत सहावा क्रमांक मिळविला. परीक्षा १७ ते १९ जून या कालावधीत झाली.

Sameer Panditrao

Goa’s Rahul Keni Becomes BCCI Match Official: गोव्याचे माजी रणजी क्रिकेटपटू राहुल केणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सामनाधिकारी बनले आहेत. अखिल भारतीय पातळीवरील परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे बीसीसीआय सामनाधिकारी मंडळात त्यांचा समावेश होईल.

राहुल यांनी अखिल भारतीय क्रिकेट सामनाधिकारी पंच परीक्षेत सहावा क्रमांक मिळविला. परीक्षा १७ ते १९ जून या कालावधीत झाली. बीसीसीआय सामाधिकारी मंडळात स्थान मिळविणाऱ्या सध्याच्या कार्यरत गोमंतकीयांत ते आता सहावे ठरले आहेत. सामनाधिकारी या नात्याने गोव्याचे माजी क्रिकेटपटू बाळकृष्ण मिस्कीन, विवेक कोळंबकर, रोहित अस्नोडकर, तसेच महिलांत कृतिका नाईक व अनुपा नार्वेकर यांचा समावेश आहे. माजी रणजीपटू उदय नाईक बीसीसीआय सामनाधिकारी मंडळातून निवृत्त झाले आहेत.

सामनाधिकारी पंच परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले राहुल यांचे गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव व व्यवस्थापकीय समितीने अभिनंदन केले असून त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी ‘युवा आंतरराष्ट्रीय’

राहुल केणी यांनी १९ वर्षांखालील वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फेब्रुवारी २००५ मध्ये जमशेदपूर येथे झालेल्या पाहुण्या इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध राहुल तिसऱ्या ‘युवा कसोटी’त खेळले होते. त्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, मात्र यष्टिरक्षक या नात्याने दोन झेल व तीन यष्टीचीतची नोंद केली होती.

त्रिशतकी भागीदारीत वाटा

यष्टिरक्षक-फलंदाज असलेल्या ३७ वर्षीय राहुल केणी यांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे २००९ ते २०१५ या कालावधीत प्रतिनिधित्व केले. २३ रणजी करंडक सामन्यांत त्यांनी ३०.८१च्या सरासरीने एक शतक व चार अर्धशतकांसह ८३२ धावा केल्या. शिवाय ३० झेल व पाच यष्टीचीत अशी कामगिरीही बजावली. २०१०-११ मध्ये जयपूर येथे राजस्थानविरुद्धच्या रणजी सामन्यात गोव्यातर्फे अजय रात्रा (नाबाद २०४) व राहुल केणी (नाबाद ११५) यांनी चौथ्या विकेटसाठी ३१० धावांची अभेद्य भागीदारी केली होती. राहुल यांनी २७ एकदिवसीय व १० टी-२० सामन्यांतही गोव्याचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. मागील काही वर्षांत ते १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या संघाचे प्रशिक्षक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT