Aren Dsilva Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Aren Dsilva : गोमंतकीय फॉरवर्ड आरेन पुन्हा 'FC Goa'च्या जर्सीमध्ये; म्हणाला, "गोवासाठी खेळणे नेहमीच गौरवास्पद"

FC Goa : फुटबॉलपटू आरेन डिसिल्वा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसी संघाचा सदस्य होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गोमंतकीय फुटबॉलपटू आरेन डिसिल्वा पुन्हा एफसी गोवा संघात दाखल झाला असून २०२४-२५ मधील बाकी मोसमात तो या संघाच्या जर्सीत पाहायला मिळेल. तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसी संघाचा सदस्य होता.

‘एफसी गोवासाठी खेळणे नेहमीच गौरवास्पद आहे,’’ असे मत आरेन याने एफसी गोवा संघाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

‘‘हा केवळ माझ्यासाठी मूळ गावचा क्लब नसून भारतातील एक बलाढ्य संघ आहे. आयएसएल स्पर्धेच्या प्रारंभापासून मी या क्लबचा चाहता आहे आणि पुन्हा या संघाची जर्सी परिधान करण्यास मिळत असल्याची भावना आगळीच आहे,’’ असे २७ वर्षीय आरेन पुढे म्हणाला.

‘‘फुटबॉलपटू या नात्याने मला प्रगतीपथावर राहून प्रशिक्षक जी जबाबदारी देतील पेलायची आहे. माझ्या विकासात प्रशिक्षक मानोलो प्रेरक शक्ती ठरले आहेत. माझ्यासाठी ते वडिलांसमान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणे आव्हानात्मक आहे, त्याचवेळी फायद्याचेही आहे,’’ असे आरेन याने नमूद केले.

‘‘आरेनच्या समावेशाने संघाच्या ताफ्यात चांगली भर पडली आहे. हवेतील चेंडूवर त्याचे प्रभुत्व असून तांत्रिकदृष्ट्या सरस आहे. त्याची गोल करण्याची आणि वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता आमच्यासाठी लाभदायक ठरेल,’’ असे एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्केझ यांनी आरेनचे संघात स्वागत करताना सांगितले.

आरेन डिसिल्वाची कारकीर्द

  • सेझा फुटबॉल अकादमीचा प्रशिक्षणार्थी

  • २०१७ साली एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात दाखल

  • या संघातर्फे २०१९ मध्ये गोवा प्रोफेशनल लीग आणि २०२० मध्ये गोवा पोलिस कप विजेता

  • आयएसएलच्या २०२०-२१ मोसमात एफसी गोवाच्या मुख्य संघात बढती

  • २०२१-२२ मोसमात मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसी संघात दाखल

  • हैदराबाद एफसीतर्फे २०२१-२२ मोसमात आयएसएल कप विजेतेपद

  • हैदराबादतर्फे ३९ सामन्यांत ४ गोल व १ असिस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT